BJP Adhiveshan : लोकसेभला फटका, विधानसभेला घेतला धसका; भाजपच्या अधिवेशनातील 'त्या' भल्या मोठ्या पोस्टरचीच चर्चा

BJP state conclave in Pune : भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणनीती आखताना जो संविधान बदलाचा नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीच्या वेळी तयार करण्यात आला होता तो खोडून काढण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.
Pune bjp meeting
Pune bjp meeting Sarkarnama
Published on
Updated on

BJP meeting in Pune : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 'अब की बार, चारसो पार'चा नारा दिला. त्यांच्या या घोषणेचा उपयोग करून विरोधकांनी भाजपला 400 पेक्षा जास्त जागा या संविधान बदलण्यासाठी लागत असल्याचा प्रचार केला. या प्रचारामुळे विरोधकांचा मोठा फायदा तर सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसला होता.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत असाच फटका बसू नये म्हणून भाजपकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून संविधाना प्रति भाजपची (Bjp) अधिक प्रमाणात श्रद्धा आहे, हा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देखील याची झलक पाहायला मिळाली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिवेशन पुण्यात होत आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्रभरातून पाच हजाराहून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत. या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबतच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) देखील मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांचा रोड मॅप तयार करण्यात येत आहे.

भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणनीती आखताना जो संविधान बदलाचा नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीच्या वेळी तयार करण्यात आला होता तो खोडून काढण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. याची सुरुवात या अधिवेशनातून झाल्याचे पाहायला मिळाले. हा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आक्रमकपणे व्यक्त व्हा, असा संदेश देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Pune bjp meeting
Video Devendra Fadnavis : आदेशाची वाट पाहू नका, ठोकून काढा; देवेंद्र फडणवीसांचे फर्मान

त्याचप्रमाणे अधिवेशनाच्या सभागृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानासोबतचा मोठा पोस्टर लावण्यात आला आहे. या पोस्टरवर "मेरे जीवन का हर पल डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिए गए भारत के संविधान के महान मूल्यों के प्रति समर्पित है। यह हमारा संविधान ही है, जिससे एक गरीब और पिछडे परिवार में पैदा हुए मुझ जैसे व्यक्ति की भी राष्ट्रसेवा का अवसर मिला है। ये हमारा संविधान ही है, जिसकी वजह से आज करोडों देशावासियों को उम्मीद, सामर्थ्य और गरीमापूर्ण जीवन मिल राहा है।' असे लिहण्यात आले आहे.

(Edited By : Sachin waghmare)

Pune bjp meeting
Devendra Fadnavis News : फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com