Pune Shivajinagar Vidhan Sabha Election : पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी 36702 मतांनी विजय साकार केला असून ते सलग दुसऱ्यांदा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 2019 ला झालेला सामना पुन्हा एकदा 2024 ला पाहायला मिळाला. महायुतीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवलं तर गेल्यावेळी अवघ्या 2800 मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यावरती महाविकास आघाडीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला.
यंदा महायुतीकडून पहिल्याच यादीमध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात अली. सिद्धार्थ शिरोळे यांना महायुतीने पुन्हा एकदा उमेदवारी दिली. काँग्रेस कडून उमेदवारी मिळवण्यासाठी मात्र दत्ता बहिरट यांना काहीसा संघर्ष करावा लागला. त्यानंतर अखेरच्या यादीत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र तत्पूर्वी त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आंदोलन देखील करावं लागलं होतं. मिळाल्यानंतर देखील दत्ता बहिरट यांच्यासाठी चा विधानसभेचा खडतरच राहिला.
उमेदवारी मिळाली असली तरी दत्ता बहिरट यांना स्व पक्षातील इच्छुक असलेल्या मनीष आनंद यांच्या बंडखोरीचा सामना देखील करावा लागला..तिकीट न मिळाल्याने मनीष आनंद यांनी बंडखोरी करत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील केली. मात्र निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मनीष आनंद यांना संभाजी राजे छत्रपती यांनी पाठिंबा दर्शवला होता.
महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या वाटेला येणार हे जवळपास निश्चित मानले जात होतं. या विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह माजी नगरसेवक सनी निम्हण देखील इच्छुक होते. त्यांनी काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी यासाठी देखील प्रयत्न केला होता मात्र दोन्हीकडूनही उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांची नाराजी महायुतीच्या उमेदवाराला त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांची नाराजी दूर केली.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठ लीड घेण्यात अपयश आलं होतं. विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना अवघड 5000 चे लीड मिळालं होतं. ही भाजपासाठी धोक्याची घंटा मानली जात होती त्यामुळे त्या दृष्टिकोनातून भाजपने या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद पणाला लावली होती प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मैदानात आणलं होतं. दुसरीकडून दत्ता बहिरट यांनी देखील विचाराचा झंजावत सुरू ठेवला होता.
मतमोजणी च्या पहिल्या फेरीपासूनच सिद्धार्थ शिरोळे यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती सिद्धार्थ शिरोळे यांना 84 हजार 695 मत मिळाली तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून उभे असलेले दत्ता भैरट यांना 47 हजार 993 मते मिळाली काँग्रेस कडून बंडखोरी केलेले मनीष आनंद यांनी 13061 मतं घेतली.गेल्या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांना अवघ्या 2800 मतांनी विजय आला होता मात्र यंदा त्यांनी मोठा विजय साकार केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.