Supriya Sule News : '' तीन वेळा बारामतीत भाजप माझ्याविरोधात लढला, याही वेळेस...''; खासदार सुळेंचं सूचक विधान

NCP Political News : '' आता दिल्लीत काय दडपशाही चालते हे संपूर्ण देश पाहतो. पण...''
Supriya Sule On State Government :
Supriya Sule On State Government : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati Politics : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली असून, महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यात पवारांची बारामती काबीज करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यातच आता राष्ट्रवादीचा अजित पवारांचा एक गट सत्तेत सोबत आल्यामुळे आता बारामतीत खासदार सुळेंविरोधात भाजप कुणाला मैदानात उतरवणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. याचवेळी बारामती लोकसभा निवडणुकीतील लढतीविषयी खासदार सुळेंनी सूचक वक्तव्य केलं आहे.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या वेळी राज्यातील सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. सुळे म्हणाल्या, देशात आमच्याकडून तरी लोकशाही आहे, आता दिल्लीत काय दडपशाही चालते हे संपूर्ण देश पाहतो. पण आमच्याकडून लोकशाहीच आहे.

मला असं वाटतं की, कोणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण सर्वांनीच या गोष्टीचा मानसन्मान करायला हवा, तीन वेळा भाजप माझ्याविरोधात लढला आहे. याही वेळेस कोणीतरी लढणारच, लोकशाहीचे मी मनापासून स्वागत करते, ही लोकशाही जगली टिकली पाहिजे, त्यामुळे सर्वांनीच अशा निर्णयाचे पूर्ण ताकदीने स्वागत करायला हवे, असेही सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule On State Government :
Supriya Sule Indapur Tour : इंदापूरात खासदार सुप्रिया सुळे अॅक्टिव्ह! दोन आठवड्यात दुसरा दौरा, काय आहे कारण?

सुळे म्हणाल्या, केंद्र सरकार किंवा भाजप(bjp)च्या विरोधात काही बोलले तर काहीतरी कटकारस्थान ते करतातच, सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची याचे आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे एका चॅनलवर बंदी आणणे हे आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. एका चॅनलवर 72 तासांची बंदी आणण्याच्या प्रकाराला न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे चाप बसला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत, पाच दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनात एक दिवस किमान या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा ठेवायला हवी होती, महागाई बेरोजगारी यावर चर्चा झाली नाही, पाच दिवसांचे अधिवेशन चारच दिवसांत गुंडाळले, ही बाब दुर्देवी आहे. स्वार्थासाठी जुमलेबाजी केली गेली. लोकांच्या पदरात या अधिवेशनातून काहीही पडलेले नसल्याचा आरोपही सुळे यांनी या वेळी केला.

दुष्काळ, बेरोजगारी, महागाई यात बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यासमोर विविध आव्हाने आहेत. काश्मीर, मणिपूरच्या प्रश्नांबाबत गंभीर स्थिती आहे. मोठी आव्हाने असताना भाजप जी कटकारस्थान करतो, त्याचे मला काहीही आश्चर्य वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

आता सर्वांनीच नागपूरकरांच्या मदतीला धावून जायला हवे, एक मात्र नक्की भाजपचे नेतृत्व पक्ष फोडणे, घर फोडणे, एजन्सीचा वापर यात इतके मग्न असतात, त्यांना विकासासाठी वेळच नाही. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis )जालन्याच्या घटनेच्या वेळेस प्रचाराला गेले होते. गाडी अडवू नये ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा मानसन्मान व्हायला हवा. मात्र, देवेंद्रजींनी पक्ष फोडण्याऐवजी विकासाकडे लक्ष दिले असते, तर कदाचित नागपूरकरांवर हा दिवस आला नसता, असेही सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule On State Government :
Ramdas Athawale News : 'माझ्या कामाला आला स्पीड; कारण माझ्या पाठीशी उभा होता मुंडेंचा बीड'

'' मला जुनी संसद आवडते...''

या देशाचा सगळा इतिहास जुन्या संसदेच्या वास्तूत आहे. त्या भिंती बोलक्या आहेत, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील अशा अनेक थोर व्यक्तींची परंपरा आहे, 15 ऑगस्टचे पं. नेहरूंचे भाषण आजही सर्वांच्या लक्षात आहे. स्वातंत्र्याचा सर्व लढा या वास्तूने पाहिलेला आहे. त्यामुळे माझ्यादृष्टीने त्या वास्तूशी माझं भावनिक नातं आहे. या वास्तूत आम्ही अनेक दिग्गजांकडून काहीतरी शिकलो आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.