Murlidhar Mohol in Delhi : मोदी, शहांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्याचा 'मल्ल' दिल्लीच्या राजकीय आखाड्यात गाळतोय घाम!

Murlidhar Mohol and Delhi Vidhansabha Election : केंद्रीयमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने दिल्ली निवडणुकीसाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे आणि त्यासाठी मोहोळ हे दिल्लीत ठाण मांडून आहेत.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Muralidhar Mohol is campaigning in Delhi : विधानसभा निवडणूक जिंकून दिल्लीचा गड काबीज करण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. पुढील काही तासांत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दिल्ली काबीज करायचीच असाच चंग भाजपने बांधला असून त्यासाठी देशातील विविध नेत्यांना दिल्लीमध्ये कामाला लावलं आहे. यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील दिल्ली निवडणुकीसाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली असून त्यासाठी मुरलीधर मोहोळ हे दिल्लीत ठाण मांडून आहेत.

गेली दहा वर्षे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. या दहा वर्षांच्या सत्ता काळामध्ये बहुतांश कालावधीत अरविंद केजवाल(Arvind Kejariwal) हे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले आणि त्यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर व्हावं लागलं. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी केजरीवाल यांनी कंबर कसली आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांचे मनसुबे उधळून टाकण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लॅनिंग करण्यात येत आहे.

Murlidhar Mohol
Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभा लढण्यासाठी युवकांनी फिरवली पाठ; ज्येष्ठ उमेदवारांची संख्या वाढली!

दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने या ठिकाणी देशभरातून आलेले नागरिक स्थायिक झाले आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणसांचा देखील दिल्लीमध्ये टक्का मोठा आहे. तब्बल तीन लाख मराठी भाषिक दिल्लीमध्ये मतदार असल्याचं सांगितलं जातं. हा मराठी लोकांचा मतदानाचा टक्का दिल्ली विधानसभा निवडणुकीत डिसाईडिंग फॅक्टर बनू शकतो त्यामुळेच भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना दिल्लीमध्ये पाचरण करत या मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला.

देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्रातून माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड(Bhagwat Karad) आणि पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावर दिल्लीतील मराठी मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोबतच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे संगम विहार आणि बदरपुर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या विधानसभा मतदारसंघातील प्रचार आणि रणनीती आखून हे मतदारसंघ भाजपला जिंकून देण्याची जबाबदारी मुरलीधर मोहळ यांच्यावर असणार आहे.

Murlidhar Mohol
AAP MLAs join BJP : दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 'AAP'ला मोठा झटका; आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohol)यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांनी चांगल्या रीतीने पार पाडली अनेक ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या उमेदवार विजयी देखील झाले. त्यानंतर आता दिल्लीतील दोन विधानसभा मतदारसंघाची मुरलीधर मोहोळ यांच्यावर जबाबदारी सोपवली असल्याने या मतदार संघात भाजपचा परफॉर्मस कसा राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com