

पुणे/बालेवाडी ता. १६ ः सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने त्यावरून वाद उद्भवला होता. त्यानंतर भिमाले यांनी बाणेर येथील कर्करोग रुग्णालयालाही यशवंतराव भिमाले नाव दिले आहे. भाजपमध्ये एकमत नसतानही हे नाव दिले आहेच, पण बहुसंख्य नगरसेवकांनाही या माहिती देखील नाही. हे नाव कोणालाही विश्वासात न घेता लपून छपून दिल्याने यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिका आणि अपुलकी मेडिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने १५० खाटांचे अत्याधुनिक कॅन्सर आणि हृदयविकार रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचे उद्या (ता.१७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे.
या रुग्णालयाला ‘पुणे महापालिका आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमाचे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर स्व. प्रा. यशवंतराव भिमाले कर्करोग रुग्णालय’ असे नाव देण्यात आले आहे. या रुग्णालयाला भिमाले यांच्या वडिलांचे नाव उद्घाटन झाल्यानंतर दिले जाणार असल्याची चर्चा होती.
तसेच शुक्रवारी या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पत्रकार गेले असता त्यांनाही या केवळ पुणे महापालिका आपुलकी मेडिकल केअर सेंटर असे नाव दिल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला शनिवारी (ता. १६) या यशवंतराव भिमाले हे नाव असलेला फलक लावल्याचे दिसून आले.
या नव्या कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी या भागात अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. पण त्यावर भिमाले यांच्या वडिलांचे नाव नाही. महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतही हे नाव नाही. पण रुग्णालयाच्या इमारतीवर यशवंतराव भिमाले असे नाव देण्यात आले आहे हे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले
पुणे महापालिकेच्या उद्यानांना केवळ राष्ट्रीय नेत्यांची नावे, वनस्पतिशास्त्र किंवा पर्यावरण क्षेत्रात उल्लेख करणाऱ्यांचे नाव द्यावेत असा ठराव केला होता. त्यामुळे नगरसेवकांना त्यांच्या नातेवाइकाचे नाव देता येणार नाही होते. तरीही सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला भिमाले यांनी त्यांच्या वडिलांचे नावे दिले.
त्यावरून स्थानिक नागरिकांनी त्यास प्रचंड विरोध केला, त्याविरोधात रस्तायवरून उतरून आंदोलने करण्यात आली. शहारातील खासदार, आमदार तसेच भाजपच्या नेत्यांकडेही तक्रार करण्यात आली. पण त्याचा काहीही उपयोग झाली नाही. अखेर याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
" हे रुग्णालय सॅलिसबरी पार्क येथे होणार होते. त्यामुळे चार वर्षांपूर्वीच त्याला माझ्या वडिलांचे नाव देण्याचा ठराव नाव समितीमध्ये करून घेतला होता. पण हे रुग्णालय आता बाणेर येथे स्थलांतरीत झाल्याने त्यास नाव दिले आहे."
- श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.