BJP Politics : लोकसभेची रणनीती महापालिका निवडणुकीत; दिग्गजांचा पत्ता होणार कट, भाजपचा पुण्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार!

BJP Master Plan Pune mahapalika Election : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांना तीन कसोट्या पार कराव्या लागणार आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील भाजपने उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारची सर्वेक्षण केली होती
BJP formulates a Lok Sabha-inspired strategy for Pune civic polls, targeting a complete political overhaul.
BJP formulates a Lok Sabha-inspired strategy for Pune civic polls, targeting a complete political overhaul.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) नव्या रणनीतीची आखणी सुरू केली आहे. यंदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमधून उमेदवारांची निवड करण्यासाठी विविध पातळ्यांवरती सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे जो सर्वेक्षणात पुढे तोच उमेदवारीचा प्रमुख दावेदार असणार आहे. त्यामुळे पक्षाचे जुने, अनुभवी आणि माजी नगरसेवक असलेले अनेक डिगज यंदाच्या निवडणुकीत डावलले जाण्याची शक्यता आहे.

सध्या पुणे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचा पाहायला मिळत आहे. एका उमेदवारीसाठी चार ते पाच इच्छुक प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यामुळे या इच्छुकांमधून योग्य उमेदवार निवडण्यासाठी भाजपकडून विविध पातळ्यांवर सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची देखील नेमणूक करण्यात आली असल्याची चर्चा आहे. या सर्वेक्षणातून उमेदवारांच्या लोकप्रियतेचा, कामगिरीचा आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेचा अभ्यास केला जात आहे. जातीय समीकरणे देखील यामध्ये महत्त्वाचा भाग असणार आहे.

BJP formulates a Lok Sabha-inspired strategy for Pune civic polls, targeting a complete political overhaul.
Sanjay Raut: संजय राऊत हे सगळं खोट लिहितात, आपल महत्व वाढवण्यासाठी धडपड?

त्यामुळे यंदाची महापालिकेसाठीची उमेदवारी केवळ सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रियता गमावलेले, जनतेशी संपर्क नसलेले किंवा कार्यक्षमतेत मागे पडलेले माजी नगरसेवक बाजूला ठेवले जाणार आहेत. पक्षाला पुन्हा एकदा पुणे महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवायची असून त्यासाठी ‘विजय योग्य’ उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार आहे.

तीन सर्व्हेक्षण होणार

हे सर्वेक्षण तीन पातळ्यांवर करण्यात येणार असून केंद्रीय, प्रदेश पातळी आणि संघटनात्मक पातळीवरती ही सर्वेक्षण होणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांना तीन कसोट्या पार कराव्या लागणार आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील भाजपने उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारची सर्वेक्षण केली होती. हे सर्वेक्षण आधारभूत ठरवत विधानसभेची आणि लोकसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. आता हाच फॉर्मुला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील वापरण्यात येणार आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी

भाजपची रणनीती नव्या चेहऱ्यांना संधी देणारी असली तरी अनेक जुन्या आणि अनुभवी नेत्यांसाठी ती डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अनेक नाराज उमेदवारीसाठी इतर पक्षांची वाट धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

BJP formulates a Lok Sabha-inspired strategy for Pune civic polls, targeting a complete political overhaul.
Beed Crime : 'संतोष देशमुख पार्ट-2 करणार, तुझ्या *** तीन कोयते...', परळी मारहाण प्रकरणात मुंडेची ऑडिओ क्लीप व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com