
Pune News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीतील तिघांना अटक केली आहे. अमोल तापकीर, ओम तीर्थराम, किरण पडवळ अशी तिघांची नावे आहेत. तर बाबू पवार हा गजा मारणेचा भाचा फरार आहे. या चौघांविरोधातही भारतीय न्याय संहिता कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवजयंतीदिवशी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती. तर देवेंद्र जोग (Devendra Jog) कोथरूडमधील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी चौघांनी देवेंद्र जोग यांना कट मारला.
याच गोष्टीवरून जोग आणि चौघा आरोपींमध्ये वाद झाला. चौघांनीही गाडीचा धक्का लागला असे म्हणत जोग यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका बाजूला पुण्यातील गँगवॉर कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पोलिसांना कडक निर्देश आहेत. पण टोळ्यांची दादागिरी सुरूच असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
या घटनेनंतर केंद्रीय मुरलीधर मोहोळ यांनी जखमी असलेल्या कर्मचाऱ्याची व्हिडिओ कॉलवर विचारपूस केली आहे. जोग मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये सोशल मिडियाचे काम करतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.