PCMC elections : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या; महेश लांडगेंकडून चार टर्म नगरसेवक राहिलेल्या नेत्याला मोठं पद

PCMC mayor election News : राज्यातील महापलिका निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीकडे लागले आहे. या दोन्ही पदासह स्थायी समितीच्या सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.
Pimpri Chinchawad corporation
Pimpri Chinchawad corporation Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : राज्यातील महापलिका निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीकडे लागले आहे. या दोन्ही पदासह स्थायी समितीच्या सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. त्यातच सर्वच पक्षाकडून गटनेता निवडला जात आहे. त्यातच आता पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौर भाजपचा होणार आहे. त्यातच आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचा गटनेता हा सभागृह नेता असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 32 सांगवी गावठाणमधून ते भाजपकडून निवडून आले आहेत. त्यांची ही चौथी टर्म आहे. प्रशांत शितोळे हे आमदार महेश लांडगे यांचे मित्र आहेत. गेल्या काही दिवसापासून गटनेतेपदी कोणाची निवड केली जाणार याची उत्सुकता लागली होती. त्यातच शनिवारी दुपारी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली.

Pimpri Chinchawad corporation
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची लगबग... पण शिवसेना आमदारांच्या मनात वेगळचं काहीतरी; भाजप-राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी

भाजपने 2017 च्या तुलनेत आपली कामगिरी सुधारली असून 77 वरून 84 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शहरात 'कमळ' पुन्हा एकदा जोरात फुलले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत 37 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पिंपरी-चिंचवड हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र येथे आता गेल्या दोन टर्मपासून भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.

Pimpri Chinchawad corporation
Sunetra Pawar News: धाराशिवची लेक झाली बारामतीच्या 'वहिनी'; समाजकारण ते उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांविषयी जाणून घ्या सर्वकाही

महायुतीचे वर्चस्व या महापालिकेत दिसणार आहे. सत्तेच्या समीकरणात भाजप (BJP), शिंदे सेना आणि अजित पवार गट यांच्या रूपाने महायुतीचेच वर्चस्व पालिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असेलेले काँग्रेस, मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला या निवडणुकीत खाते उघडण्यासाठी संघर्ष करावा लागला असून त्यांची संख्या नगण्य राहिली आहे.

Pimpri Chinchawad corporation
Ajit Pawar: पवार नावाचा वारसा अजून जिवंत आहे! राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच; नाशिकच्या नेत्यांनी घेतला भावनिक पुढाकार

या महापालिकेत भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 37, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 तर अपक्ष 4 नगरसेवक निवडून आले आहेत. 128 नगरसेवकांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेले 65 संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे महापौर भाजपचा होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण पुरुषासाठी खुले आहे. त्यामुळे आता येत्या काळात महापौर कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Pimpri Chinchawad corporation
Ajit Pawar Death : दादांची शेवटची सही सुद्धा स्मशानभूमीच्या कामासाठी, दुर्दैवी योगायोग सांगताना सरोज अहिरेंना अश्रू आवरेना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com