Bjp Pune News : PM मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला कार्यकर्त्यांनीच फासले हरताळ!

BJP Slogans on Walls In Pune City : शहरातील भिंतींवर घोषवाक्या लिहून विद्रुपीकरण?
Pune News
Pune NewsSakarnama
Published on
Updated on

Pune Politics News :

भाजपकडून स्वच्छ भारत अभियानाचा एकीकडे गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सामान्य कार्यकर्ते हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा पाठ देशाला शिकवताना दिसत आहेत. पण दुसरीकडे निवडणूक आल्यानंतर हा पाठ भाजपचे नेते आणि कार्यकर्ते विसरलेत की काय? असा प्रश्न सध्या शहरातील भिंतीकडे पाहिल्यानंतर येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करत असले तरी भाजपकडून निवडणुका म्हणलं की पक्षाची एक वेगळीच निवडणूक यंत्रणा कामाला लागते. भाजपकडून निवडणुकीपूर्वी वेगवेगळे नियोजित कार्यक्रम आखले जातात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा Bjp चा मानस असतो. यासाठी संवाद यात्रा, पदाधिकारी- कार्यकर्ता मेळावे, नागरकांशी संवाद कार्यक्रम, हळदी-कुंकवाचे कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भाजपचे नेतेमंडळी करताना दिसतात.

Pune News
Baramati Loksabha : शेवटची निवडणूक म्हणतील...भावनिक करतील; पण मी उभा केलेल्या उमेदवारालाच निवडून द्या; अजित पवार

भाजपची ही निवडणूक यंत्रणा लोकसभा निवडणुकीपूर्वीच वर्ष सहा महिने कामाला लागली आहे. या अंतर्गत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रम दिले जातात. सध्या भाजपकडून शहरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान राबविण्यात येत आहे.

यामाध्यमातून बूथ समितीची बैठक घेणे, बूथ समिती आणि पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीचा आढावा, व्हॉटसॲप ग्रुप तयार करणे, विकसित भारतसाठी ब्रँड अबॅसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, प्रत्येक बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, प्रभावशाली व्यक्तिंची भेट घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे, विविध समाज घटकांच्या बैठका घेणे अशाप्रकारची कामे करण्यात येणार आहेत.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नुकतेच झालेल्या पदाधिकारी बैठकीत सार्वजनिक आणि खासगी सोसायट्यांच्या भिंतींवर ‘कमळ’ या चिन्हासोबतच मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठीची स्लोगन ( घोषवाक्य) पेंट करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या नेत्याचा आदेश पाळण्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांनी भिंती रंगवण्याचा धडाका लावलाय. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र भाजप नेते याकडे कानाडोळा करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत सरकारनामाला माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भिंती चित्राच्या माध्यमातून शहरात स्लोगन रेखाटण्याचे आदेश केंद्रीय पातळीवरून आले आहेत. त्या दृष्टीने स्थानिक पदाधिकारी आपापल्या भागामधील मालकाची परवानगी घेऊन खासगी भिंतींवर भिंती चित्र रेखाटनार आहे. याची सुरुवात शहराध्यक्ष म्हणून आपण केली आहे, असे धीरज घाटे म्हणाले.

श्रीनाथ भिमाले यांनीही भिंती चित्र रेखाटले आहेत. पुढील कालावधीमध्ये संपूर्ण शहरांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहेत. हे अभियान केंद्रीय पातळीवरून आले असून गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही अशा प्रकारच्या भिंती रंगवण्यामध्ये हातभार लावला असल्याचे घाटे यांनी सांगितलं.

edited by sachin fulpagare

Pune News
Lok Sabha Elections 2024 : अजितदादांचे चॅलेंज, पार्थ पवारांचा दौरा आता सुनेत्रा पवार मैदानात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com