Lok Sabha Elections 2024 : अजितदादांचे चॅलेंज, पार्थ पवारांचा दौरा आता सुनेत्रा पवार मैदानात!

Sunetra Pawar News : शिरूर मतदार संघ आणि बारामती मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आपण शब्द दिला म्हणजे पाळणार. कसा निवडून येतो तेच पाहतो, अशी जाहीर भाषणांमध्ये विरोधकांना चॅलेंज देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार करत असतात. अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेल्याने अजित पवार यांच्या जिव्हारी लागले. त्यांनी थेट अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो निवडूण आणणार असे चॅलेंज दिले. बारामती मतदाससंघात देखील अजित पवार मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या चॅलेंजनंतर बारामती आणि शिरुर मतदारसंघात पार्थ पवार सक्रिय झाल्याचे चित्र होते. आता पार्थ पवार यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील या मतदारसंघांमध्ये दौरे वाढले आहेत. (Lok Sabha Elections 2024)

Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
Ramdas Athawale News : आठवलेंनी पुन्हा दिली भुजबळांना ऑफर ; म्हणाले, 'भाजपपेक्षा...'

शिरूर मतदार संघ आणि बारामती मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात कोण दंड थोपटणार याबाबत अजून स्पष्टता आली नाही. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा बारामती आणि शिरूर मतदार संघामध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हेंना दिलेल्या चॅलेंजनंतर अजित पवार शिरूर लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर पार्थ पवार सातत्याने शिरुर मतदार संघातील हडपसर परिसरात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसले. तर कधी ते बारामती मतदारसंघातील खडकवासला परिसरामध्ये पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेताना दिसले. त्यामुळे एकीकडे बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा असतानाच दुसरीकडे कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शनिवारी (ता.3) शिरूर मतदार संघातील वाघोली परिसरात सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेवून मनमोकळेपणाने संवाद साधला. लोणीकंद येथे हळदी कुंकू कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. परतीच्या प्रवासात त्यांनी वाघोलीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची भेट घेतली. या भेटीगाठीतून सुनेत्रा पवार अंदाज घेत असल्याची देखील चर्चा आहे.

(Edited By Roshan More)

Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
Devendra Fadanvis: पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष ते मुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com