PCMC Mayor Election 2026 : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी महेश लांडगेंचे पंख छाटले? पक्षात प्रवेश द्यायला विरोध केलेल्या नेत्याला थेट महापौरपद

BJP Mahesh Landge controversy : पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्या नेत्याला थेट महापौरपद दिल्याने भाजपमध्ये अंतर्गत राजकारण तापले आहे. महेश लांडगे प्रकरण चर्चेत.
Mahesh Landge vs BJP State President
Mahesh Landge vs BJP State PresidentSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad BJP Politics: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांची निवड निश्चित झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यांचा एकमेव अर्ज सोमवारी (ता.२) नगरसचिवांकडे दाखल झाल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्याची औपचारिक घोषणा शुक्रवारी (ता. ६) निवड प्रक्रियेच्या दिवशी होईल. दरम्यान, रवी लांडगे यांचे नाव निश्चित करून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आमदार महेश लांडगे यांना शह दिल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने १२८ पैकी ८४ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांचाच महापौर होणार हे निश्चित होते. मात्र, या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? विशेषतः चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक महापौर होणार? याची उत्सुकता होती.

त्यावरून सत्तासूत्र कोणाकडे राहणार? हेही स्पष्ट होणार होते. या सर्व प्रकारावर सोमवारी पडदा पडला. महापौरपदासाठी रवी लांडगे व उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांनी नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

Mahesh Landge vs BJP State President
पोर्शे हिट अँड रन अपघात प्रकरणी मोठी अपडेट: तुरुंगात असलेल्या तीन आरोपींना कोर्टाकडून दिलासा

आमदार लांडगे यांना शह

चिंचवड, भोसरी व पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आणि विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी वाटून घेतल्याचे चित्र आहे. अखेर भोसरी मतदारसंघातील विशेषतः भोसरीतील आणि तेही आमदार लांडगे यांच्या भावकीतील नगरसेवकाचे नाव महापौरपदासाठी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने निश्चित केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे आमदार लांडगे यांना मोठा राजकीय शह असल्याचे बोलले जात आहे.

भोसरी प्रभाग सहा ‘ब’ जागेवरून रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले आहेत. २०१७ मध्येही ते याच प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. मात्र, स्थायी समितीचे सभापती पद न दिल्याने त्यांनी उघडपणे भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व नंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. आता २०२५-२६ चा महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.

पण लांडगे यांना पक्षात घेण्यास त्यांचा विरोध होता. तरीही, पक्ष नेतृत्वाने त्यांना पक्षात प्रवेश आणि उमेदवारीही दिली होती. आता त्यांनाच महापौरपद दिल्याने आमदार लांडगे यांना पक्षश्रेष्ठींनी दुसरा झटका दिला आहे.

रवी लांडगे हे भाजपचे दिवंगत माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत. अंकुश लांडगे यांनी भाजपची शहरातील नगरसेवकांची संख्या एक अंकीवरुन दोन अंकावर नेली होती. लांडगे कुटुंबाची हीच ताकद ओळखून स्थानिकांचा विरोध असतानाही प्रदेशचे माजी संघटन सरचिटणीस, आमदार श्रीकांत भारतीय यांनी रवी लांडगे यांना पक्षात आणले.

Mahesh Landge vs BJP State President
PCMC News : पिंपरी-चिंचवडमध्ये 'हायव्होल्टेज ड्रामा'; भाजपने दिलेले उपमहापौरपद नाकारून नगरसेवकाचा महापालिकेतून काढता पाय

शिवाय महापौरपदासाठी रवी लांडगे यांचे नाव अंतिम करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष न्याय देतो, हेही दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. रवी लांडगे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याबाबतचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीचे पत्र भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना मिळाले. त्यात म्हटले आहे की, ‘‘पिंपरी चिंचवडच्या महापौरपदासाठी रवी बाबासाहेब लांडगे आणि उपमहापौरपदासाठी विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांची नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.’’ असे म्हंटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com