मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शीतलादेवी यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. ११ फेब्रुवारी) तब्बल सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यती (Bullock cart race) थरार रंगला. शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हस्ते शर्यतींना प्रारंभ करण्यात आला. माझ्या राजकीय जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे प्रतिक्रियाही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. भिर्र् झाली...उचल की टाक...या पहाडी आवाजात परिसर दुमदुमून गेला होता. तब्बल सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहताना बैलगाडा शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने जमले हेाते. आज (ता. ११ फेब्रुवारी) ३०० बैलगाडे धावले असून उर्वरित बैलगाडे उद्या (ता. १२ फेब्रुवारी) शर्यतीत सहभागी होणार आहेत. (Bullock cart race in Landewadi after seven years)
लांडेवाडी येथे गेल्या महिन्यात बैलगाडा शर्यतींना दिलेल्या परवानगीला जिल्हाधिकारी यांनी रात्री उशिरा अचानकपणे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे कारण देऊन निर्बंध लागू केले होते. त्यामुळे शर्यत रद्द झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांचा आणि बैलगाडा मालकांचा हिरमोड झाला होता. गावकऱ्यांनी केलेली जय्यत तयारी वाया गेली होती. व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संतप्त बैलगाडा मालकांनी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शर्यतीच्या घाटात धरणे आंदोलन केले होते. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकाही केली हेाती.
कोरोनाचे संकट निवळत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नियम व अटींचे पालन करण्याची हमी देऊन लांडेवाडी येथे शर्यतीना परवानगी दिली आहे. तब्बल ८०२ बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी करून शर्यतीत सहभागी झाले आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, संगमनेर, पारनेर, मावळ तालुक्यातील बैलगाडे लांडेवाडीत आले आहेत, असे सरपंच अंकुश लांडे यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंग एंरडे, डॉ. ताराचंद कराळे, सुनिल बाणखेले, अरुण गिरे, प्रविण थोरात, खंडेराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते. भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे,योगेश बाणखेले, माजी सरपंच जानकु पानसरे, राजेंद्र शेवाळेव ग्रामस्थांनी व्यवस्था पहिली.
बैलगाडा मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा : आढळराव
तब्बल सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यती सुरु झाल्यामुळे बैलगाडा मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. माझ्या राजकीय जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले नियम व अटींचे पालन करूनच बैलगाडे सुरु आहेत. गावकऱ्यांचेनियोजन उत्कृष्ठ आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.