Ashok Tekwade FIR : शेतकऱ्याची जमीन गहाण ठेवली, परस्पर 50 लाखांचा कर्ज घेतलं; माजी आमदारावर गुन्हा दाखल

Ashok Tekwade Cheating Farmer : शिरूर पोलिस ठाण्यात माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकवडे यांनी शेतकऱ्यांची फसणूक केल्याचे समोर आले आहे.
Ashok Tekwade
Ashok Tekwadesarkarnama
Published on
Updated on

Ashok Tekwade News : व्यावसायिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला कर्ज मंजूर झाले नाही, असे सांगत त्याच्याच कागदपत्रावर त्याची जमीन गहान ठेवत तब्बल 50 लाखांचे खर्च स्वतःच्या नावावर वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी सचिन बाळासाहेब गरुड यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार माजी आमदार टेकवडे याच्यसाह त्यांचा मुलगा अजिंक्य, पत्नी विजया तसेच दिलीप नारायण वेल्हेकर, बाळासाहेव मा. काळे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप व गणेश अंकुश जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गरड यांनी अशोक टेकवडे संस्थापक असलेल्या अजित नागरिक सहकारी बँक तसे अजित मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीकडे कर्जसाठी फूड व्यवसाय उभारण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जमीनीसह पत्नीच्या नावावर असलेलेी अडीच एकर जमीनीचे गहाणखत करून दिले.

Ashok Tekwade
Paithan art center license issue : कला केंद्राविरोधात जलसमाधीचा इशारा; तहसीलदारांच्या झाडाझडती धक्कादायक माहिती समोर

बँकेकडून कागदपत्र अपूर्ण असल्याचे सांगत त्यांना कर्ज मंजुर करण्यात आले नसल्याचे सांगितले. ही घटना 2019 मध्ये घडली. दरम्यान, अचानक थकबाकी कर्जापोटी जमीन जप्त करण्याची दौंड तहसीलदारांची नोटीस गरुड यांना आली. त्यांना या प्रकरणी खोलात जाऊन चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

टेकवडे यांच्यासह काही व्यक्ती, पतसंस्थेचे संचालक, खजीनदार यांनी गरुड यांची जमीन हहान ठेऊन त्यावर 50 लाख रुपये मंजुर करून घेतले. तसेच त्यावेळी कर्ज मंजुर करण्याच्या नावाखाली गरुड यांच्याकडून सही करून घेतलेल्या धनादेशांचा यासाठी वापर केला. तसेच कर्ज मंजुर झाल्यानंतर पैसे परस्पर आपल्या खात्यात वळवले. दरम्यान, गरुड यांनी न्यायालयात धाव घेत फसवणुकीचा प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर न्यायलायने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

Ashok Tekwade
Tribal Birhad Morcha: धक्कादायक; सरकारी उदासीनतेचा बळी, आदिवासी बिऱ्हाड मोर्चातील युवकाने संपवले जीवन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com