Election Duty : मतदारयादी कामात शिक्षकाची हलगर्जी, पुण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Case Filed Against Teacher : मतदारयादीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मतदारयादी पुनरिक्षण, जनगणना, निवडणूक प्रक्रिया कामे सुरू आहेत. या कामाची जबाबदारी देऊनही ती पार न पाडणाऱ्या शिक्षक आणि लिपीकावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Voter List
Voter List Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिक्षकांना शिक्षणासोबतच विविध शासकीय कामांची जबाबदारी दिली जात असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मतदारयादी पुनरिक्षण, जनगणना, निवडणूक प्रक्रिया अशा अनेक अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांचे मूळ अध्यापन कार्यही प्रभावित होत असल्याची नाराजी शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

मात्र या कामांकडे दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, हेही अलीकडील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून अशा निष्काळजीपणाची दखल घेतली जात असून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त कामांचा ताण असला तरी जबाबदारीने काम पार पाडणे आवश्यक असून, अन्यथा टाळाटाळ आता शिक्षकांनाच अंगलट येण्याची शक्यता वाढली आहे.

मतदारयादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात विशेष पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर काम सुरू असताना, नेमून दिलेल्या कर्तव्यात टाळाटाळ व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एका शिक्षकासह सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिकावर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Voter List
Teacher Verification : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ! 3 लाख कर्मचाऱ्यांची कुंडली तपासणार; SIT ॲक्शन मोडमध्ये!

याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक अनिल विलास गायकवाड (वय ४२, रा. जांब, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल, पुणे येथील शिक्षक शेख शहनाबाज युनूस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक प्रताप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारयाद्यांचे सखोल पुनरीक्षण करण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मतदार यादीतील नोंदींची पडताळणी, त्रुटी दुरुस्ती, नवीन मतदारांची नोंदणी आणि एकूण प्रक्रियेचे काटेकोर पालन करणे अपेक्षित होते.

पोलिसांकडूनअधिक तपास

शिक्षक आणि लिपिक यांनी दुर्लक्ष करत सखोल पुनरिक्षणाच्या कामात टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या कामात अडथळा निर्माण झाल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

Voter List
Fake Disability Certificate Scam : दिव्यांग बनावट प्रमाणपत्र प्रकरण तापलं; 20 शिक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार, झेडपी फौजदारी करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com