Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल बाळगता येणार नाही. मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रणास बंदी राहील. ज्वलनशील वस्तू आणि शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस सह आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
पुणे पोलिस Pune Police आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर Polling Booth नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत पुणे मतदारसंघासह शिरुर मतदारसंघातील शिरूर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील काही भागाचा समावेश होतो. येथे देखील चोख पोलिस .बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावर ज्वलनशील वस्तू आणि शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या परिसरातील प्रतिबंधात्मक आदेश उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती भा.दं.वि. कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे पोलिस सह आयुक्त पवार यांनी आदेशात नमूद केले आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.