

Pune News : जगात संशोधन खूप महत्त्वाच आहे. सध्या ज्या प्रकारचे संशोधन होत आहे, त्याचा देशाला, समाजाला थेट फायदा होत सत नाही. आज महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ त्यांनी काही तरी युनिक संशोधन केले आहे, असा दावा करत नाही. आयआयटीमध्ये रोज नवे संशोधन होते, ते समाजाला काहीतरी देत आहेत, अशा शब्दात दस्तुरखुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच महाराष्ट्रातील विद्यापीठांचे जाहीरपणे वाभाडे काढले.
डीईएस पुणे विद्यापीठात 'स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमटिक्स'च्या नवीन इमारत व संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, संशोधनाचा लाभतळागाळातील कोटीवधी लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत समाज आणि देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकत नाही. दर्जेदार संशोधकासाठी उत्तम प्रशिक्षणाचीही आवश्यकता आहे. प्रशिक्षणामुळे नोकऱ्या उपलब्ध होतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो आणि देश श्रीमंत होतो. पण आज महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ त्यांनी काही तरी युनिक संशोधन केले आहे, असा दावा करत नाही.
आयआयटी रोज नवे संशोधन करीत असून, समाजाला काहीतरी देत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही नेमके काय भरीव काम केले? हा मला पडलेला प्रश्न आहे. केलेही असेल, तर मला त्याबद्दल माहिती नाही, अशा शब्दांत पाटील यांनीच पुणे विद्यापीठासह राज्यातील विद्यापीठांच्या संशोधनाचा स्तरच दाखवून दिला.
मार्गदर्शक मंडळाचा प्रस्ताव :
संशोधनाला अधिक गती देण्यासाठी एका स्वतंत्र गटाची गरज आहे. त्या गटाचे अध्यक्षपद, मार्गदर्शक पद डॉ. रघुनाश माशेलकर यांनी घ्यावे. यात विविध विषयांवर संशोधन करणाऱ्या संस्थांचे वीस-बावीस ग्रुप करू. दर २ महिन्यांनी बैठका घेऊन विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील संशोधन प्रकल्पांवर चर्चा, मूल्यमापन आणि मार्गदर्शन केले जाऊ शकते. अशा उपक्रमांना राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य देण्याची आमची तयारी आहे. तसा जीआर देखील काढू, असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.