BJP West Bengal : पाप धुण्यासाठी जवळीक..! तृणमूलमध्ये फूट पडताच बंगाल सरकारमधील मंत्र्याने भाजपला सावधानतेचा इशारा

Swapan Dasgupta news : भाजपमधील काही नेत्यांनी तृणमूलमधील आमदार, खासदार भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते.
Swapan Dasgupta, Suvendu Adhikari
Swapan Dasgupta, Suvendu AdhikariSarkarnama
Published on
Updated on

TMC crisis : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तब्बल ५९ आमदारांनी वेगळा गट स्थापन करत विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर कब्जा केला आहे. पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे. खुद्द ममतांनी या फुटीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे.

तृणमूल पक्षात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. भाजपमधील नेत्यांकडूनच तसा दावा केला जात आहे. यापार्श्वभूमीवर बंगाल सरकारमधील मंत्री स्वपन दासगुप्ता यांनी पक्षाला सावधानतेचा इशारा दिला आहे.

दासगुप्ता यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसच्या आत्मविनाशाबद्दल मला कसलीही सहानुभूती नाही. मला फक्त एकच आशा आहे की, हिंसाचाराचे राजकारण, तोडफोडीचे राजकारण करणारी राजकीय संस्कृती भाजपमध्ये येणार नाही. आपली भूतकाळातील पापं धुवून काढण्यासाठी आमच्याशी जवळीक साधणाऱ्या अशा लबाड मित्रांपासून भाजपमधील आम्ही सर्वांनीच सावध राहायला हवे, असे दासगुप्ता यांनी म्हटले आहे.

Swapan Dasgupta, Suvendu Adhikari
MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

पश्चिम बंगालच्या राजकीय शुद्धीकरणाची प्रक्रिया थांबू नये, अशी अपेक्षाही दासगुप्ता यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, भाजपचे तृणमूलीकरण होऊ देणार नाही. भाजपमध्ये तृणमूलमधील लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. पक्षांतर्गत राजकारणातच पक्ष संपून जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

Swapan Dasgupta, Suvendu Adhikari
BJP news : माजी मुख्यमंत्री भाजपला रामराम ठोकणार? मातब्बर नेत्याचे नाव घेत काँग्रेसने वाढविले टेन्शन

भाजपमधील काही नेत्यांनी तृणमूलमधील आमदार, खासदार भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते. भाजप नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर लगेच त्यांचा प्रवेश होऊ शकतो, असेही नेत्यांकडून सांगितले जात होते. आता मात्र पक्षातील नेत्यांकडून वेगळी भूमिका मांडली जाऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com