Chandrakant Patil News : वाद थांबवा; चंद्रकांत पाटलांची पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन राज्यात राजकारण तापले आहे.
Chandrakant Patil News
Chandrakant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News : भाजप (BJP) नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र, पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे शाईफेक झाली होती. त्यावरुनही राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यावर पाटील यांनी पुन्हा एकदा दिलगीरी व्यक्त केली आहे.

पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे. ''जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे.''

Chandrakant Patil News
Gram Panchayat : गावात हरलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी शेवटी जिंकून दाखवलं

''त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते.''

मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे, त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे.

Chandrakant Patil News
मोठी बातमी : शिवसेनेला भाजपचा पाठिंबा; शिंदे गटाच्या सामंतांविरोधात एकत्र!

माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com