Pune News, 20 Jun : भाजप नेते तथा उच्च व तंत्रिशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मनसेसोबत युती केल्यास ठाकरेंच्या थोड्यातरी जागा येतील, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. समाजकारणही शोधा. राज्यात हिंदी सक्ती झालेली नाही.
इंग्लिश कशी काय जगाची भाषा आहे? असा सवाल करत तिसरी भाषा म्हणून हिंदीचा आग्रह नाही. मात्र, तुम्ही इंग्लिश विरोधात आंदोलन करत नाही. 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांची भाषा चालते आणि हिंदीला विरोध करताय, असं असेल तर इंग्लिशला देखील विरोध करा.
तर यावेळी त्यांनी मनसेच्या हिंदी बाबतच्या भूमिकेवर नाराजी दर्शवली. ते म्हणाले देशात लोकशाही आहे ठोकशाही नाही, ज्याला शिकायचं आहे त्याला शिकू द्या ना, शिकवू देणार नाही, पाट्या फोडू हे काय योग्य नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले, युतीला उशीर का होतोय? काहीही अट नाही तर दोन मिनिटात करा. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, गणेश नाईक, छगन भुजबळ हे सगळे होते तरी सुद्धा भाजप होती. भाजप वाढत गेली बाकी विखुरले गेले.
उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती केली तर तर त्यांच्या थो्ड्या तरी जागा येतील. अन्यथा त्यांचे नगरसेवक निवडून येणार नाही, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. तसंच अजून चार महिने निवडणुकीला आहेत. तोपर्यंत त्यांचे सगळेच नगरसवेक एकनाथ शिंदेंकडे जातील.
उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसला जवळ करून पाहिलं पण काही जमलं नाही. आता ते मनसेला सोबत घेऊ पाहत आहेत. चांगलं आहे लोकशाही आहे. समोर विरोधक चांगले पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंना डिवचलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.