MLA Sunil Tingre : टिंगरेंना टोमणा हाणत, मुळीकांनीं ठोकला विधानसभेवर दावा !

NCP Ajit Pawar Vs BjP : वडगावशेरी परिसरामध्ये जगदीश मुळीक यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टर्स लागल्याच्या पाहायला मिळत आहेत. पोस्टर मध्ये 'युवा स्वच्छ प्रतिमेचा माणूस, कामाचा सर्वसामान्यांचा हक्काचा जगदीश मुळीक' असा उल्लेख करण्यात आला आहे.
Bjp Jagdish Mulik
Bjp Jagdish MulikSarkarnama

Pune News : लोकसभा उमेदवारीसाठी वारंवार प्रयत्न करून देखील त्यामध्ये अपयश आल्यानंतर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आगामी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मुळीक यांचे लागलेले पोस्टर सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनले आहेत.

या पोस्टरच्या माध्यमातून जगदीश मुळीक यांनी आमदार सुनील टिंगरे यांना टोमणा मारत आपल्या उमेदवारीचा खुट्टा मजबूत करण्याचा प्रयत्न केला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

वडगावशेरी विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे आहेत.मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील टिंगरे यांनी भाजपचे उमेदवार असलेल्या जगदीश मुळीक यांचा अटीतटीच्या लढतीमध्ये पराभव केला होता. मात्र गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली असून अजित पवार हे आता भाजपसोबत महायुतीमध्ये आहेत.त्यामुळे सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक हे महायुतीच्या मित्र पक्षाचा एक भाग आहेत.

Bjp Jagdish Mulik
Mahayuti : दादांचे आमदार असलेल्या जागांवर शिंदेंचा दावा, महायुतीत जागा वाटपाचा पेच वाढणार?

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये कुठली जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबतच्या अधिकृत चर्चा अद्याप तरी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झालेली नाही.तरी देखील स्थानिक पातळीवर मतदार संघाबाबत दावे होताना पाहायला मिळत आहेत. सध्या पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे आहे.आणि एका विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आमदार आहे.

आगामी निवडणुकीमध्ये आठही जागांवरती निवडणूक लढण्यास भाजपचे स्थानिक नेते इच्छुक आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) कडून हडपसर, वडगावशेरी सह खडकवासला आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाने देखील हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला ह्याच मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे.अशातच वडगावशेरी परिसरामध्ये जगदीश मुळीक यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टर्स लागल्याच्या पाहायला मिळत आहेत. पोस्टर मध्ये 'युवा स्वच्छ प्रतिमेचा माणूस, कामाचा सर्वसामान्यांचा हक्काचा जगदीश मुळीक' असा उल्लेख करण्यात आला आहे.

Bjp Jagdish Mulik
Pune Bar Drugs Case Update : फर्ग्युसन रस्त्यावरील 'त्या'बार, हॉटेलवर महापालिकेने केली कारवाई !

कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये वडगावशेरी चे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव सातत्याने चर्चेत होतं. सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकून अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा देखील आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर करण्यात येत होता. या सर्व प्रकारामुळे कुठेतरी आमदार सुनील टिंगरे हे बॅक फुट वर केले असल्याचं दिसत असतानाच स्वच्छ प्रतिमेचा माणूस या आशयावर मुळीक यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे. आणि या माध्यमातून एक प्रकारे टिंगरेना टोमणा मारला असल्याचे देखील बोलले जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com