Ajit Pawar : 'माळेगावात किटलीच्या प्रभावामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या सभा वाढल्या'; कट्टर विरोधकाची अजित पवारांचे नाव न घेता खोचक टीका

Malegaon factory in the election Politics : माळेगाव कारखाना निवडणूकीरून सध्या येथील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनेलकडून आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच लक्ष केलं जात आहे.
Ajit Pawar Malegaon factory in the election Politics
Ajit Pawar Malegaon factory in the election Politics sarkarnama
Published on
Updated on

Malegaon News : माळेगाव कारखाना निवडणूकीत आम्ही सभासदांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर युती केली नाही. युती झाली असती तर साखर धंद्यात निर्भीड व सडेतोड धोरणात्मक निर्णय घेण्यास बंधने आली असती. सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे उमेदवार सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत लोक संपर्कातील आहेत. सभासद हिताच्या दृष्टीने आमच्या कारकर्दीमध्ये झालेला विकास प्रचारात घरोघरी पोचवत आहे. परिणामी पणदरे, सांगवी, नीरावागज आदी गटांमध्ये किटलीचा बोलबाला वाढला आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्र्याना गावोगावी सभा घेत फिरावे लागतयं, असा खोचक टोला विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला आहे.

बारामती दूध संघ संगमनेरच्या तुलनेत खूप मागे राहिला, ब वर्ग संस्था मतदार संघातील उमेदवारांना चेअरमन होता येत नाही, माळेगावच्या इन्कमटॅक्स माफीचे श्रेय उपमुख्यमंत्र्यांनी घेणे अशा मुद्यांच्या आधारे तावरे यांनी सताधाऱ्यांवर सडकून टिका केली. ते निरावागज (ता.बारामती) येथे मंगळवार (ता.17) सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उमेदवार रंजन तावरे, राजेश देवकाते, केशव देवकाते, भालचंद्र देवकाते, रामचंद्र नाळे, प्रकाश सोरटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, माळेगावच्या निवडणकीत सत्ताधाऱ्यांबरोबर युती केली असती, तर ऊस उत्पादकांना पुरेसा ऊस दर देऊ शकलो नसतो. युती झाली असती तर साखर धंद्यात निर्भीड व सडेतोड धोरणात्मक निर्णय घेण्यास बंधने आली असती. त्यामुळे आम्ही सहकार बचाव पॅनेलची निर्मिती केली. त्या पॅनेलच्या किटली चिन्हाला चांगला प्रतिसाद येत आहे. ब वर्ग संस्था मतदार संघाबाबत बोलताना तावरे म्हणाले, सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात 'ब' वर्ग प्रतिनिधी (सहयोगी सदस्य) चेअमरन होऊ शकत नाही. चेअरमन हा 'अ' वर्ग सदस्य (संचालक मंडळ सदस्य) असणे आवश्यक आहे. संचालक मंडळ आपल्यापैकी एकाची चेअमन म्हणून निवड करते. संचालक मंडळात मत देण्याचा किंवा चेअरमन पदाच्या निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार नसतो.

Ajit Pawar Malegaon factory in the election Politics
NCP Ajit Pawar Politics: भाजप, शिवसेनेत प्रवेश सोहळे, अजित पवारांची महापालिका निवणुकीसाठी खास रणनीती!

जिल्हा बँक, दूध संघासह अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी हे उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करातत. ते पदाधिकारी गाड्या, चालक व इतर सुविधा घेतात आणि सभासद शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च करतात. हे उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही. आम्ही कारखान्याचा नव्हे तर रोजंदारीवरील चालक मदतीला घेतला की ओरडतात. नेते केवळ मत मागण्यासाठी माळेगाववर अर्थिक शिस्तीचा बनाव करतात, अशा शब्दात तावरे यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले.

Ajit Pawar Malegaon factory in the election Politics
Ajit Pawar : 114 मुस्लिम कर्मचारी हटवले म्हणून देसाईंनी थेट दादांना आमदाराला आवर घालायला सांगितलं..

किटलीला विजयाची संधी

माळेगावच्या निवडणूकीमध्ये शेती आणि शेती पुरक व्यवसायाच्या दृष्टीने व साखर उद्योगात चंद्ररावअण्णा तावरे यांनी शेतकर्‍यांबरोबर खूप काम केले आहे. त्यामुळे आपला साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी चंद्रराव अण्णांचा अत्तापर्यंतचा अनुभव खूप महत्वाचा ठरणार आहे. ही बाब विचारात घेवून सभासद किटली चिन्हाला विजयाची संधी देतील, असा विश्वास राजेश देवकाते यांनी व्यक्त केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com