Malegaon Sugar Factory : पसंतीच्या चिन्हासाठी अजितदादांच्या पठ्ठ्याने मध्यरात्री एकलाच निवडणूक कार्यालय गाठले; बारामतीत तावरे-पवार पॅनेलमध्ये बाचाबाची!

Baramati Election News : सत्ताधारी आणि विरोधकांमधील भांडणे सोडवताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांना घटनास्थळी यावे लागले. ते आल्यानंतर कार्यकर्त्यांची पांगापांग झाली.
Malegaon Sugar factory Election
Malegaon Sugar factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Malegaon, 13 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत इतिहासात प्रथमच चार पॅनेलमध्ये लढत होत आहे. चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आज होता, त्यामुळे पसंतीच्या चिन्हासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचे नितीन सातव हे गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री एक वाजताच निवडणूक कार्यालयात हजेरी लावली. होती. विरोधी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे हे उशिरा येऊनही रांगेत उभे न राहता थेट कार्यालयात गेल्याने एकच गोंधळ उडाला. त्यावेळी दोन्ही गटांत प्रचंड गोंधळ आणि बाचाबाची झाली. शेवटी विभागीय पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. पोलिसांची मध्यस्थी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून प्रथम येणाऱ्या पसंतीनुसार चिन्हाचे वाटप केले जाईल, असे जाहीर केली. त्यानंतर वादावर पडदा पडला.

निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी कार्यालयात प्रथम आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नीळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार नितीन सातव (Nitin Satav) यांना त्यांच्या मागणीप्रमाणे कपबशी चिन्ह मिळाले आहे. विरोधी रंजन तावरे यांच्या पॅनेलला किटली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बळिराजा पॅनेलला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Malegaon Sugar Factory Election) बैठका घेऊनही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या 21 जागांसाठी तब्बल 90 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बारामतीच्या निवडणूक कार्यालयात आज पॅनेलला चिन्हांचे वाटप करण्यात येणार होते. उमेदवार चिन्हाचे वाटप सकाळी साडेदहापासून करण्यात येणार होते.

सत्ताधारी निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार नितीन सातव हे पसंतीचे चिन्ह मिळावे, यासाठी पहिल्यांदा रांगेत येऊन उभे राहिले होते. सातव हे गुरुवारी मध्यरात्री एकलाच रांगेत येऊन उभे राहिले होते. प्रथम येणाऱ्यास पसंतीचे चिन्ह मिळणार होते, त्यानुसार नितीन सातव यांनी परिचित असलेल्या कपबशी चिन्हावर दावा केला.

Malegaon Sugar factory Election
Baramati Politic's : बारामतीत पवार काका-पुतणे पुन्हा आमने सामने; ‘माळेगाव’च्या निवडणुकीत चौरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार

त्याचवेळी विरोधी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे हे निवडणूक कार्यालयात आले. ते रांगेत उभे न राहता थेट निवडणूक कार्यालयात गेले. प्रथम येणाऱ्यास पसंतीचे चिन्ह वाटप या प्रक्रियेविरोधात त्यांनी आवाज उठवला. चिन्हवाटपच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच गोंधळ उडाला. अभूतपूर्व परिस्थिती निर्मिण झाली.

सत्ताधारी निळकंठेश्वर पॅनेलचे समर्थक स्वप्निल जगताप, विजय तावरे, किरण तावरे, शिवराज जाधवराव, प्रताप आटोळे, डी. डी. जगताप आदी कार्यकर्ते आणि विरोधी पॅनेलचे रंजन तावरे, युवराज तावरे, अजिंक्य तावरे आदींमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला.

सत्ताधारी आणि विरोधकांमधील भांडणे सोडवताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांना घटनास्थळी यावे लागले. ते आल्यानंतर कार्यकर्त्यांची पांगापांग झाली, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत प्रथम येणाऱ्यास त्यांच्या पसंतीचे चिन्ह देईल, असे जाहीर केले. त्यानुसार सातव यांना सर्वपरिचित असणारे कपबशी चिन्ह मिळाले आणि त्यानंतर वादावर पडदा पडला.

Malegaon Sugar factory Election
Solapur NCP SP : पवारांचा सोलापूरसाठी मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी मोहिते पाटलांच्या कट्टर समर्थकाची वर्णी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याप्रमाणे विरोधकांशी हातमिळवणी करून निवडणूक लढवली जाईल, अशी चर्चा होती. चर्चेनंतरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत चार पॅनेल रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी होता. मात्र, आता प्रचारासाठी केवळ आठच दिवस मिळणार आहेत, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com