Bawankule on Pawar : मुख्यमंत्री म्हणून फडणवीस नको : हीच होती पवारांची खरी अडचण; बावनकुळेंचा दावा

BJP and NCP : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis, Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis, Sharad Pawar and Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यात २०१९ ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच यावर भाष्य केले. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे आज कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ''शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते'', असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis, Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Nashik News; शेतकऱ्यांचा इशारा, अन्यथा विधानभवनावर कांदे फेकू!

बावनकुळे म्हणाले, ''मी आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. शरद पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस भुई सपाट होईल. त्यामुळे शरद पवारांना भाजप सोबत युती हवी होती. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नको होते'', असा मोठा दावा त्यांनी केला.

Devendra Fadnavis, Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Sanjay Shirsat News : शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर, त्यावर दावा कसा सांगणार ?

''शरद पवार यांच्याबाबत माझे मत आहे की, फडणवीस हे त्यांना मुख्यमंत्री म्हणून नको होते. ही भूमिका नेहमीच त्यांनी मांडली आहे. शरद पवार हे फडणवीस द्वेशी आहेत. त्यांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको. त्यांचा अजेंडा आहे की, फडणवीसांना विरोध करायचा. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काहीही करू शकतात'', असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

Devendra Fadnavis, Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Sanjay Raut News; दिल्लीचा गोलमाल चालू देणार नाही!

तसेच कसबा पोटनिवडणुकीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ''कसब्यामध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने जिंकून येतील. आमचे सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत. तसेच राज्य आणि केंद्र हे डबल इंजिन सरकार मुक्ता टिळक यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करतील यावर लोकांचा विश्वास आहे'', असंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com