Excise Deparment News : सुषमा अंधारेंच्या वसुली यादीने 'एक्साइज' घायाळ, अधिक्षकांचे प्रत्युत्तर 500 गुन्हे...

Sushma Andhare : चरणसिंग रजपूत यांच्या उत्तराने सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर यांचे समाधान झाले नाही. परवाने दाखवा, असे प्रतिआव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.
charanjit singh rajput Sushma Andhare
charanjit singh rajput Sushma Andharesarkarnama

Ravindra Dhangekar News : राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या केबिनमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वसुलीची यादीच वाचून दाखवली. पुणे शहर आणि परिसरातील 70 पब, 30 ढाबे, 32 बिअर शॉपी आणि काही वाइन शॉपींकडून उत्पादन शुक्ल खात्याचे अधिकारी प्रत्येक पन्नास ते दीड लाखांपर्यंत रूपयांची वसुली करत असल्याचे अंधारे म्हणाल्या. अंधारे हा आकडा वाचून दाखवताना उत्पादन शुल्कचे अधिक्षक चरणसिंग रजपूत हाताची घडी घालून शांत ऐकूण घेत होते. पण सुषमा अंधारेंनी यादी वाचायच्या थांबल्या आणि उत्पादन शुल्कचे अधिकाऱ्यांनी देखील अंधारेंच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.

सुषमा अंधारे Sushma Andhare, आमदार रवींद्र धंगेकर यांचे आरोप चुकीचे आहेत. दरवर्षी पेक्षा दुप्पटीने वाढ झालीये. 17 परवाने रद्द करण्यात आले आहेत. केस दाखल आहेत. 19 तारखेनंतर डीपार्टमेंट अॅक्टीव्ह झाल्याच्या चर्चा आहेत मात्र त्यात तथ्थ नाही. नियमावलीनुसार सर्व लायसन्स दिले आहेत. प्रशासकीय अधिकारी आहे मी जबाबादारीने बोलतोय, असे प्रत्युत्तर चरणसिंग रजपूत यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

charanjit singh rajput Sushma Andhare
Kagal Assembly Election : कागलमध्ये विधानसभेचं वारं; महायुतीतच ‘बिग फाईट’, घाटगे-मुश्रीफ लागले कामाला...

अधिकाऱ्याच्या उत्तराने सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांचे समाधान झाले नाही. आम्ही चुकीचे आहोत असे म्हणत असाल तर आम्ही नाव घेतलेल्या परवाने दाखवा, असे प्रति आव्हानच सुषमा अंधारे यांनी दिले. मात्र, तुम्ही लिस्ट द्या आम्ही कारवाई करतो.नियमावलीनुसार सर्व लायसन्स दिले आहेत. मी प्रशासकीय अधिकारी आहे मी जबाबादारीने बोलतोय, असे ठणकावून सांगितले.

रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांनी 'एक्ससाइज'च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यापीठामध्ये गांजा कसा मिळतोय. महाविद्यालयांच्या समोर बिअरबार कसे आहेत, एका बारचा परवाना घेऊन तीन बार चालवलले जात असल्याचे आरोप 'एक्ससाइज'च्या अधिकाऱ्यांवर करण्यात आले.

charanjit singh rajput Sushma Andhare
Pune Police: पुणे 'कार'नामा; आरोपीच्या बापाचा डॉक्टरांना आला फोन अन् रक्ताचे सॅम्पल डस्टबिनमध्ये...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com