Jain Boarding Land Video: मोठी बातमी! जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचा निर्णय

Jain Boarding Pune : जैन बोर्डिंग संदर्भात आज मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये या व्यवहारसंदर्भात 'स्टेटस्को'चे आदेश देण्यात आले आहेत.
Jain Boarding
Jain Boarding sarkarnama
Published on
Updated on

Jain Boarding News : पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. संचालकांनी गैरव्यवहार करत ही जमीन अवघ्या 270 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप जैन बांधवांनी केला होता. या प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता.

आज (सोमवारी) जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहार संदर्भात मुंबई येथे तातडीची सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणात परिस्थिती 'जैथे थे' ठेवण्याची म्हणजे 'स्टेटस्को' आदेश दिले आहेत. त्यामुळे या जागेच्या विक्रीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या व्यवहारासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांनी देखील मोठा निर्णय घेत बुलढाणा अर्बन बँकेने डीडीआरला पत्र देऊन आपला बोजा कमी करण्याची विनंती केली आहे. तर, त्यामुळे बँकांनी दिलेले कर्ज परत घेण्याची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.

Jain Boarding
farmer's relief : दिलासादायक! अतिवृष्टीभागातील 'या' 6 जिल्ह्यांना मिळणार अतिरिक्त मदत, सुधारित पंचनामेही पूर्ण

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. एवढ्या घाईघाईने या जागेच्या विक्रीचा निर्णय घेण्यात का आला, हा प्रश्न समाजाला पडला आहे. सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घटनेत कुठेही जागा विक्रीबाबत तरतूद केलेली नाही. तरीसुद्धा या जागेच्या विक्रीस परवानगी देण्यात आली, यामागे नक्की कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड व्हायला हवे, असे त्यांनी म्हटले होते.

Jain Boarding
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी नाशिकला पुन्हा येईल, भगवा फडकवुनच जाईल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com