Lokmanya Tilak Award : नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास पुणे काँग्रेसचा विरोध

Pune Congress Opposes Award to Narendra Modi: पुणे काँग्रेसकडून पत्राद्वारे तशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Pune Congress News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. पुणे शहराध्यक्षाने तसे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले आहे. दुसरीकडे, पुरस्कार देणारी संस्था ही स्वतंत्र असूनही त्यांनी कुणाला पुरस्कार द्यावा, त्यांचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिली आहे.

पुण्यातील टिळक स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) राष्ट्रीय पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. कार्यरत असलेले पंतप्रधानांना प्रथमच या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी म्हणजे १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Narendra Modi
Finance Ministry Issue : अर्थमंत्रिपदाबाबत उत्सुकता वाढली; जीएसटी परिषदेला फडणवीसांनी पाठविले ‘या’ मंत्र्याला

दरम्यान, पुण्यातील काँग्रेस पक्षाने मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. पुणे काँग्रेसकडून पत्राद्वारे तशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आलेली आहे. आता प्रदेश काँग्रेस कमिटी यावर कोणता निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Narendra Modi
Bhujbal Question to Pawar : आम्हाला भाजपबरोबर लढायला सांगता अन्‌ हळूच जाऊन त्यांच्याशीच चर्चा करता?; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

याबाबत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देणारी संस्था ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे त्या संस्थेने कोणाला पुरस्कार द्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

Narendra Modi
Mohol NCP News : राजन पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची लवकरच सभा; बारसकरांकडून घेतली सोलापूरची खडान्‌खडा माहिती

पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या पुरस्काराची एक महिना आधीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com