Chhagan Bhujbal : भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार अन् जयंत पाटील बाकी है..., दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची चर्चा थांबेना!

Chhagan Bhujbal joins cabinet : छगन भुजबळ यांची अचानाक महायुती सरकारने त्यांची मंत्रीपदी वर्णी लावली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रीपद भुजबळ यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar, Supriya Sule, Jayat Patil, Chhagan Bhujbal
Rohit Pawar, Supriya Sule, Jayat Patil, Chhagan BhujbalSarkrnama
Published on
Updated on

Pune News, 20 May : राज्याच्या राजकारणामध्ये आज एक महत्त्वाची घडामोडी घडत आहे. राज्यामध्ये प्रचंड बहुमताचा सरकार आल्यानंतर देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारण्यात आलं होतं.

त्यानंतर भुजबळांनी जाहीरपणे आपली नाराजी आणि मनातली खदखद संधी मिळेल त्यावेळी व्यक्त केली होती. मात्र, आता अचनाक महायुती सरकारने त्यांची मंत्रीपदी वर्णी लावली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रीपद छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तर राज्यातील या सर्व अनपेक्षित राजकीय घडामोडींवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात झालेल्या समावेशाचं स्वागत करत एक सूचक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं विधान केलं.

ते म्हणाले, “छगन भुजबळ तर झाकी आहेत, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील अद्याप बाकी आहेत,” असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य केलं. हाके यांच्या मते, सुप्रिया सुळे यांना लवकरच केंद्रात आणि रोहित पवार, जयंत पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

Rohit Pawar, Supriya Sule, Jayat Patil, Chhagan Bhujbal
Jayant Narlikar : 'विज्ञाना'ची गंगा घरोघरी पोहचवणारा 'खगोलऋषी' हरपला, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात उशिरा का होईना समावेश झाला याचे स्वागत करताना हाके म्हणाले, “ओबीसी दृष्टिकोनातून भुजबळ यांची उपस्थिती आवश्यक होती.” मात्र, तेवढ्यावर समाधान न मानता आगामी काळातील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसींच्या आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भुजबळ यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Rohit Pawar, Supriya Sule, Jayat Patil, Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: वाह फडणवीस वाह ! एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? दमानियांनी करुन दिली 'त्या' घोषणांची आठवण

भुजबळ यांच्या समावेशाने ओबीसींच्या लढ्याला नक्कीच बळ मिळेल, मात्र त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील यांच्या गळ्यात देखील मंत्रीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. या नेत्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर जर ओबीसींच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणार नसतील, तर त्यांची गाठ ओबीसी चळवळीशी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा देखील हाकेंनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com