Jayant Narlikar Passes Away : जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. आज सकाळी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत नारळीकर यांचा आंतररष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता.
नारळीकर हे रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहीण्यासाठी लोकप्रीय होते. त्यांनी लहान मुलांमध्ये विज्ञानकथांची गोडी निर्माण केली होती. केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले होते. टाटा मुलभुत संशोधन संस्थेत केल्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.
2021 मधे नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मंगळवारी (ता.20) पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध गणितज्ज्ञ रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. 1957 मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली.
या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी बीए, एमए व पीएच.डी. अशा पदवी मिळविल्या. नारळीकर यांचा विवाह 1966 मध्ये मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन कन्या आहेत.
1972 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. त्यानंतर डॉ. नारळीकर यांनी 1988 मध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. भारत सरकारने 1965 मध्ये त्यांना पद्मभूषण, तर 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.