Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर पब्जचा असा करणार बंदोबस्त

Political News : येत्या काळात पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : पुणे शहरामध्ये सुरु असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. त्यांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील बारच्या मालकावर, चालकावर आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे.

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. त्यासोबतच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde ) यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. (Eknath Shinde News)

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले आहेत. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Eknath Shinde
Video Pankaja Munde : हाकेंचं उपोषण स्थगित होताच पंकजा मुंडेंची मोठी मागणी; म्हणाल्या,'जातनिहाय जनगणना..'

दरम्यान, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील बार पुणे पोलीस यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ठिकाणी भेट देत सील केला.या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा जणांना अटक केली असून कामात कुचराईचा ठपका ठेवत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बीट मार्शल यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amithesh Kumar) यांनी दिले आहेत.

याच प्रमाणे शहरांमधील सर्व अवैध गोष्टींना पोलिस आयुक्तांनी आळा घालावा. तसेच महापालिकेच्या आयुक्तांनीही देखील शहरातील अवैध अनधिकृत बार आणि रूप टॉप हॉटेल्सवर कारवाई करावी अशी, अपेक्षा राज्यसभेच्या खासदार आणि भाजपच्या (Bjp) नेत्या मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde
Lok Sabha Session News : नव्या मराठी खासदारांनी पहिल्याच दिवशी दिल्ली गाजवली;'है तयार हम' म्हणत वज्रमूठ आवळली !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com