Pune BJP News: भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच चित्रा वाघ मैदानात; ट्विट करत म्हणाल्या...

Pramod Kondhare molestation case : प्रमोद कोंढरे हे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्का देऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Chitra wagh
Chitra waghsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने पोलीस महिला अधिकाऱ्याचा विनभंग केला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांकडून या संदर्भात फरासखाना पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सोमवारी (ता.23) पुणे दौऱ्यावर होते. गडकरी यांच्या नियोजित दौऱ्यानिमित्त शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या दरम्यान दुपारी 1.30 वाजता पुण्यातील कसबा पोलीस चौकी परिसरात घडली. त्यावेळी काही भाजप पदाधिकारी स्थानिक चहाच्या टपरीवर थांबले त्याच ठिकाणी या महिला पोलिस अधिकारी ड्युटीवर होत्या.

प्रमोद कोंढरे हे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्का देऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक्स वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, आज अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. प्रमोद विठ्ठल कोंढरे, जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला.

Chitra wagh
Emergency Period Arrests: आणीबाणीविरोधात जनसंघ..; मीसाबंदी कायदा अन् 37 जणांना अटक, आता राजकीयपट व्यापणारा भाजप!

आताच यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहीती त्यांनी दिली इतकच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

अर्थात,आम्ही इतक्यावरच थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत, महिला सशक्ततेविरुद्ध मग तो आमच्या पक्षाचा का असेना वागणाऱ्याला कधीही माफ केले जाणार नाही. असं चित्रा वाघ म्हणल्या.

Chitra wagh
Shivsena UBT Controversial Banner : 'नामांतराची खुमखुमी असेल तर 'या' पेठेचे नाव मस्तानी पेठ करा...', 'कोथरुडच्या बाई' म्हणत ठाकरेंच्या शिलेदारांनी डिवचले

कोंढरेंचा राजीनामा

प्रमोद कोंढरे यांनी माझ्याकडे राजीनामा पाठवलाय.. जोपर्यंत झालेल्या प्रकाराची चौकशी होत नाही तोपर्यंत मी पदावर राहणार नसल्याचे सांगितले.. आम्ही तो राजीनामा मंजूर केलाय..

- धीरज घाटे (पुणे शहर अध्यक्ष,भाजपा)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com