PMC News : पुणे महापालिकेची हद्द वाढणार, 'हे' नवीन भाग जोडले जाणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तत्वत: मान्यता

Pune Khadki Cantonment Merged with PMC : कँटोन्मेंटच्या हद्दीत असल्याने अनेक नागरिकांना राज्य शासन व महापालिकेच्या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. आता मात्र विलीनीकरणामुळे ही अडचण दूर होणार आहे.
PMC
PMC sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेचे क्षेत्र अजून विस्तारण्याची शक्यता असून पुणे व खडकी कँटोन्मेंटमधील नागरी भाग महापालिकेत विलीन करण्याच्या राज्य सरकारच्या तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या विलीनीकरणास मान्यता देण्यात आली.

लष्करी भाग वगळता उर्वरित नागरी क्षेत्र महापालिकेत समाविष्ट होणार असून शाळा, दवाखाने, स्मशानभूमी यासारख्या सार्वजनिक सुविधा महापालिकेच्या अखत्यारीत येणार आहेत. त्यामुळे नागरी वस्तीमधील नागरिकांची समस्य सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

कँटोन्मेंटच्या हद्दीत असल्याने अनेक नागरिकांना राज्य शासन व महापालिकेच्या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. आता मात्र विलीनीकरणामुळे स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, स्वच्छता, दवाखाना आदी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

PMC
Nilesh Lanke On Jayant Patil : पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार का? लंके म्हणाले, 'मुंबईत 15 जुलैला बैठक, पवारसाहेब 'A टू Z''

जमिनीची मालकी संरक्षण विभागाकडेच

कँटोन्मेंटच्या हद्दीतील नागरी वस्तीचा समावेश महापालिकेत झाला तरी संरक्षण विभागाच्या मालकीच्या जमिनींवर एफएसआय वाढवून देण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आहे त्या जागेतच नागरिकांना बांधकाम करावे लागणार आहे. त्यांना वाढव एफएसआय मिळणार नाही. विस्तारकामांवर मर्यादा राहणार आहेत. ‘जीएलआर’ (जनरल लेझर रजिस्टर) वर नाव असले तरी प्रत्यक्ष मालकी संरक्षण विभागाकडेच राहणार आहे.

'हे' भाग होणार विलीन

पुणे कँटोन्मेंट मधील महात्मा गांधी रस्ता, ईस्ट स्ट्रीट (डावी बाजू), सेंटर स्ट्रीट, केदारी रस्ता, बाबाजान दर्गा, वच्चू अड्डा, दस्तूर मेहेर रस्ता, न्यू मोदीखाना, ओल्ड मोदीखाना, सोलापूर बाजार, वानवडी बाजार, भीमपुरा हे भाग विलिन होण्याची शक्यता आहे. तर, बंगल्यांचा परिसर यात येणार नाही.

खडकी कँटोन्मेंटमधील खडकी बाजारा, साप्रस, संगमवाडीचा काही भाग, महादेववाडी, गवळीवाडा, सुरती मोहल्ला, गाडी अड्डा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याची सोसायट्यांकडील बाजू यांचा समावेश होईल. तर, रेंजहिल्स व बंगल्यांचा परिसरात विलीन होणार नाही.

PMC
R.R. Patil : मुनगंटीवारांना झाली आर. आर. आबांची आठवण; म्हणाले, ‘ती संवेदनशीलता आता संपलीय...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com