R.R. Patil : मुनगंटीवारांना झाली आर. आर. आबांची आठवण; म्हणाले, ‘ती संवेदनशीलता आता संपलीय...’

Sudhir Mungantiwar Remembered R. R. Patil : ती महिला म्हणाली की माझे पती दारू पिऊन कार्यालयात गेले होते, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यावर मी सहजपणे म्हणालो की, दारू पिऊन पोलिस ठाण्यात गेल्यानंतर बडतर्फ तर होणारच ना?
R R Patil-sudhir mungantiwar
R R Patil-Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 12 July : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दारूबंदी सुधारणा विधेयक मांडले. त्यावर बोलत असताना त्यांनी एका बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याची पत्नीची काहणी सांगितली. त्या वेळी मुनगंटीवार यांना प्रकर्षाने आर. आर. पाटील यांची आठवण झाली, ती त्यांनी विधानसभेत बोलून दाखवली.

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, मला आज (स्व.) आर. आर. पाटील यांची आठवण होते. ते एक संवेदनशील राजकारणी होते. एका बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी माझ्या कार्यालयात आली होती. ती म्हणाली, माझे पती पाेलिस दलातून बडतर्फ झाल्याने माझ्यावर अडचणींचा डोंगर कोसळला आहे. मी विचारले, तुमचे पती पोलिस दलात काम करतात, मग बडतर्फ का झाले?

ती महिला म्हणाली की माझे पती दारू पिऊन कार्यालयात गेले होते, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यावर मी सहजपणे म्हणालो की, दारू पिऊन पोलिस ठाण्यात गेल्यानंतर बडतर्फ तर होणारच ना? त्यावर ती महिला म्हणाली, आमदारासाहेब दारू पिणे वाईटच आहे ना? मी सांगितलं, दारू पिणं वाईटच आहे. दारू पिल्याने माझे पती बडतर्फ होतात, तर मग दारू विकायला परवानगी देणाऱ्या सरकारला तुम्ही टर्मिनेट का करत नाही? त्या महिलेच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते, त्यामुळे मी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (R. R. Patil) यांना फोन केला आणि या महिलेशी बोला, असे त्यांना सांगितले, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

आर. आर. पाटील म्हणाले, बाकी (दारूबंदीबाबत) माझ्या हातात नाही. पण हिच्या पतीला चार दिवसांत कामाला घेतो. त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे संबंधित महिलेच्या पतीला चार दिवसांत कामावर घेतले. आता ती संवदेनशीलता कमी होताना दिसत आहे. म्हणजे उत्तर द्यायला सभागृहात मंत्रीसुद्धा उपस्थित राहत नाहीत. मी तर विचार करतोय की पुढच्या अधिवेशनात एक अशासकीय विधेयक आणावं, असंही मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं.

R R Patil-sudhir mungantiwar
Jayant Patil Resigns : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; पश्चिम महाराष्ट्रातील तरुण, बड्या नेत्याकडे येणार जबाबदारी?

ते म्हणाले, व्यावसायिक कोर्सेला ७५ टक्के कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही. त्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी जे मंत्री ७५ टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असतील, तर त्यांना पुढे मंत्री म्हणून काम करण्याचा अधिकार राहणार नाही, असं एक अशासकीय विद्येयक आणावं. कारण मंत्री उत्तर देण्यासाठी उपस्थितच राहणार नाहीत, तर मग काय उपयोग?

R R Patil-sudhir mungantiwar
Shivsena Politic's : शिवसेनेचे टार्गेट आता अतुल भोसले अन्‌ पृथ्वीराज चव्हाणांचा मतदारसंघ; पक्षप्रवेशाबाबत शंभूराज देसाईंनी फोडला मोठा बॉम्ब

आपण विधानसभा अधिवेशन घेतोय आणि मंत्रीच उत्तरे देण्यासाठी सभागृहात उपस्थित राहत नसतील तर ते आपल्यासाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे. एक मिनिटांसाठी आपण ७० हजार रुपये खर्च करतोय, असं विधानभेच्या उपाध्यक्षांनीच मागे एकदा सांगितले होते. विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही. मग आम्हाला काय तोंडखुरी आहे म्हणून बोलायला उभे आहोत, असा गैरसमज मंत्र्यांनी केला आहे की काय? हे मला दुःखाने मांडावे लागत आहे, अशी खंतही मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com