Mangeshkar Hospital: 'क्लीन चिट' मिळाल्यानंतर काही तासांतच डॉ. घैसासांना पुणे पोलिसांचा मोठा झटका; गुन्हा दाखल

Tanisha Bhise Death Case : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता, असा आरोप होत आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी विविध समित्यांकडून सुरु आहे.
Mangeshkar Hospital
Mangeshkar Hospital Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: गर्भवती तनिषा भिसे हिच्या उपचारासाठी दीनानाथ रुग्णालयाकडून 10 लाखांचे डिपॉझिट मागण्यात आले तसेच वेळेत उपचार करण्यात न आल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी आरोग्य विभाग आणि धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी केली आहे. त्यांचे चौकशी अहवाल देखील समोर आले आहेत. यात पहिल्या अहवालात डॉ. सुश्रुत घैसासांना क्लीन चिट मिळाल्यानंतर 48 तासांच्या आतच घैसासांसह दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या (Dinanath Mangeshkar Hospital) अडचणी वाढल्या आहेत.

पुणे पोलिस आयुक्तांना गर्भवती तनिषा भिसे मृत्यूप्रकरणाचा ससूनचा अहवाल प्राप्त झाला आहे. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी अलंकार पोलिस ठाण्यात डॉ.सुश्रुत घैसासांसह (Sushrut Ghaisas) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता तनिषा भिसे प्रकरणी डॉ.घैसास आणि मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत.

गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणात पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलं होतं. तर डॉक्टर सुश्रूत घैसास यांनी या प्रकरणात राजीनामा दिला होता. तनिषा भिसे प्रकरणात ससून रुग्णालयाचा चौकशी अहवालातून रुग्णालय आणि डॉक्टरला क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Mangeshkar Hospital
Mangeshkar Hospital Case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात 'ससून'चा अहवाल सादर! भिसे कुटुंबीय की मंगेशकर रुग्णालय दोषी?

एकीकडे मंगेशकर रुग्णालय आणि डॉ.सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव वाढत आहे. मात्र,आता ससूनच्या अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांना दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली होती. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला आहे.

पुणे पोलिसांनी अलंकार पोलिस ठाण्यात भिसे कुटुंबियांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. डॉ.सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलविरोधात दाखल करण्यात आला आहे. यामुळे तनिषा भिसे मृत्यूप्रकरणात आता पुणे पोलिसांची एन्ट्री झाली तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mangeshkar Hospital
Solapur Shivsena : मंत्री भरत गोगावलेंसमोरच शिंदेंच्या शिवसेनेचे दोन पदाधिकारी एकमेकांना भिडले; शिवीगाळ, अंगावर धावून गेले... (Video)

ससूनला अहवाल परत मागवला होता. त्या अहवालात घैसास यांनी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेचार तास रुग्ण घैसास यांच्या ऑपिडिमध्ये होता. तरी उपचार सुरू न करता वेळकाढूपणा केला. यामध्ये संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला, असेही अहवालात सांगितलं आहे.

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता, असा आरोप होत आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी विविध समित्यांकडून सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. त्या अहवालातील निष्कर्षानुसार मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिटच मिळण्याची शक्यता आहे.एकूण तीन समित्या या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Mangeshkar Hospital
Mahayuti internal conflict : महायुतीतील 'कोल्ड वॉर' कधी संपणार? निधीवाटपावरून परभणी भाजपमध्ये भडका; पालकमंत्री सावेंचाही दौरा अडचणीत

सत्य समोर येणार?

तनिषा भिसे प्रकरणात माता मृत्यू समिती, आरोग्य विभाग, धर्मादायक आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे. आता चौथा अहवाल ससून रुग्णालय पुणे पोलिस आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे तनिषा हिच्यावर उपचार करत असताना दीनानाथ रुग्णालयात हलगर्जीपणा झाला का? या प्रकरणात ते दोषी आहेत की अन्य रुग्णालयात देखील उपचार करण्यात काही चूक झाली? या सगळ्याची उत्तरे या अहवालातून पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com