Solapur Shivsena : मंत्री भरत गोगावलेंसमोरच शिंदेंच्या शिवसेनेचे दोन पदाधिकारी एकमेकांना भिडले; शिवीगाळ, अंगावर धावून गेले... (Video)

Bharat Gogawale Solapur Tour : नेमके त्याचवेळी मनोज शेजवाल आणि मनीष काळजे यांच्यात हमरीतुमरी झाली. हा वाद मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर झाला. शेजवाल आणि काळजे यांच्यात ढकलाढकली झाली. हा प्रकार पाहून गोगावले यांच्यासह उपस्थित सर्वजण अवाक्‌ झाले.
Solapur Shivsena
Solapur ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 April : शिवसेना नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. मंत्री गोगावले हे समोर असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूरमधील दोन नेत्यांमध्ये ढकलाढकली झाली. शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला, त्यामुळे मंत्री गोगावले यांच्यासह उपस्थित सारे अवाक झाले. या प्रकारामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

रोहयो मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन ते सोलापुरात आले होते. गोगावले यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील कार्यालयास भेट दिली. त्याच ठिकाणी गोगावले यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रपरिषद बराच वेळ चालली.

शिवसेनेचे इतर पदाधिकारी हे शासकीय विश्रामगृहात मंत्री गोगावले यांची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी माजी शहराध्यक्ष मनोज शेजवाल हे गोगावले अजून कसे येत नाहीत, हे पाहण्यासाठी मनीष काळजे (Manish Kalje) यांच्या कार्यालयाकडे आले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एवढा वेळ हा होतोय, अशी विचारणा केली. त्यावर मनीष काळजे यांनी वेळेनुसार दौरा सुरू असल्याचे सांगितले.

Solapur Shivsena
Adinath Election Result : ‘आदिनाथ’च्या निवडणुकीत नारायण पाटलांचे पॅनेल दीड ते दोन हजार मतांनी आघाडीवर; संजय शिंदेंना पुन्हा धक्का

नेमके त्याचवेळी मनोज शेजवाल आणि मनीष काळजे यांच्यात हमरीतुमरी झाली. हा वाद मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर झाला. शेजवाल आणि काळजे यांच्यात ढकलाढकली झाली. हा प्रकार पाहून गोगावले यांच्यासह उपस्थित सर्वजण अवाक्‌ झाले. शेवटी गोगावले यांनीच मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले. त्यानंतरही हे दोघे एकमेकांवर तोंडसुख घेत होते.

Solapur Shivsena
Adinath Election Result : जेऊर गटातून नारायण पाटील गटाचे तीनही उमेदवार विजयी; विरोधी उमेदवारांचीही कडवी लढत

मनोज शेजवाल आणि मनीष काळजे यांच्यातील वाद मिटवून मंत्री गोगावले हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात पोचले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून पुढे निघून गेले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये सोलापूरमध्ये जोरदार राडा झाला.

सावंत समर्थकांनी जाणून बुजून गोंधळ घातला : मनीष काळजे

भरत गोगावले यांच्या दौऱ्याला गालबोट लावण्याचे काम केले आहे. माजी शहरप्रमुख मनेाज शेजवाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, त्यांनी हा प्रकार केला आहे. ते सावंत समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्यात काम करतात. सावंतांनी आधी कोकणातील मंत्र्याने आमच्या जिल्ह्यात येऊन ढवळाढवळ करू नये, असे म्हटले होते. त्यांच्या हस्तकांनीच गोगावले आलेले असताच त्यांनी जाणूनबाजून हा गोंधळ घातलेला आहे, असे मनीष काळजे यांनी सांगितले.

काहींचा गैरसमज झाला, तो विषय संपला : मनोज शेजवाल

शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ते बराच वेळ थांबले होते, त्यामुळे मी मंत्री भरत गोगावले यांना फक्त घ्यायला गेलो होतो, त्याठिकाणी काहींचा गैरसमज झाला. पण भरत गोगावले हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले, त्यामुळे तो विषय त्याच ठिकाणी संपला, असे मनोज शेजवाल यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com