Ashok Chavan News : मी इथेच जन्मलो, इथेच मरणार; अशोक चव्हाण नांदेडमुक्त होऊच शकत नाही!

Hemant Patil Shiv Sena News : शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण मुक्त नांदेडचा नारा दिला आहे. महापालिकेत शिवसेना-भाजपची युती होऊ शकली नाही. अशोक चव्हाण यांचीच तशी इच्छा नव्हती, असा आरोप शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी केला होता.
Ashok Chavan-Hemnat Patil News
Ashok Chavan-Hemnat Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP-Shivsena News : शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण मुक्त नांदेडचा नारा दिला आहे. महापालिकेत शिवसेना-भाजपची युती होऊ शकली नाही. अशोक चव्हाण यांचीच तशी इच्छा नव्हती, असा आरोप शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी केला होता. अशोक चव्हाण मुक्त नांदेड करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी मात्र 'मी नांदेडचाच रहिवाशी आहे, इथेच जन्मलो अन् इथेच मरणार, त्यामुळे नांदेड अशोक चव्हाण मुक्त होऊच शकत नाही' अशा शब्दांत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.

नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेने (Shivsena) दिलेले आठ उमेदवार हे निवडून आल्यानंतर मोबाईल बंद करून भाजपला पाठिंबा देतील, त्यांना पळवले जाईल, असाही आरोप केला जात आहे. यावरही पळवपळवीचे धंदे आमचे नाहीत, ते तुमचे आहेत आम्हाला असे काही करायची गरज नाही, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी हे आरोप फेटाळून लावले.

Ashok Chavan-Hemnat Patil News
Shivsena Politics : नगरपालिकेच्या प्रचारात शिंदेंचा सामंतांना फोन, तर महापालिकेसाठी नेमकं उलटं..., 'ती' घोषणा हवेत असतानाच दिलं आणखी एक मोठं आश्वासन

नांदेड महापालिकेच्या निवडणुक प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे (BJP) खासदार अशोक चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. महापलिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Ashok Chavan-Hemnat Patil News
BJP News : भाजपने नगरसेवक बनवलेला नेता निघाला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी : बदलापूरमध्ये धक्कादायक, संतापजनक प्रकार

एका सभेत बोलताना त्यांनी 'रोज खा मटन पण कमळाचंच दाबा बटन' असे आवाहन केले होते. परंतु आपण हे वातावरण हलकं फुलकं करण्याच्या हेतून म्हणालो होतो. सध्या सगळीकडे पार्ट्या सुरूच आहेत, त्यामुळे माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढू नका. राज्यात, देशात अन् जगात जे जे काही चांगल आहे, ते माझ्या नांदेडमध्ये आले पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan-Hemnat Patil News
Pune NCP Manifesto : अजित पवार- शरद पवारांची पुण्यासाठी 'अष्टसुत्री', सत्तेत परत येण्याची गॅरंटी!

माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर भाजपमध्ये आता मोठ्या क्रमांकावर इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे कोणाचा प्रवेश झाला तर आश्चर्य वाटायला नको. देशात, राज्यात सगळीकडे भाजपची सत्ता आहे, विकास कोणता पक्ष करू शकतो हे आता लोकांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे जे कोणी येतील त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असे सांगत त्यांनी या प्रवेशाच्या चर्चाला एकप्रकारे दुजोराच दिला.

Ashok Chavan-Hemnat Patil News
Congress crisis : काँग्रेसने कष्टाने निवडून आणलेले 6 नगरसेवक फुटले : भाजपच्या निकटवर्तीय नेत्याला उपनगराध्यक्ष करण्यावरून पक्षात भूकंप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com