Nana Bhangire : पुण्याच्या पूरस्थितीवरुन तापलं राजकारण, मुख्यमंत्री शिंदेंचा थेट नाना भानगिरेंना फोन, म्हणाले...

Nana Bhangire Eknath Shinde Pune Flooded : पुणे जलमय झाल्याची जबाबदारीस्वतःला पुणे शहराचे शिल्पकार म्हणवून घेणारे देवेंद्र फडणवीस व त्यांना मुकाट्याने साथ देणारे मुरलीधर मोहोळ यांची आहे, असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
Nana Bhangire Eknath Shinde
Nana Bhangire Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Nana Bhangire News : पुण्याच्या पूरस्थितीवरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून पुरासाठी भाजपला जबाबदार धरण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्थितीचा आढाव घेत पूरग्रस्त भागाला भेट दिली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदे गट देखील मागे नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भागगिरे यांना फोन करत युद्धपातळीवर मदत करण्याच्या सूचना केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारे शिवसेनेकडून (शिंदे गट) पुणे शहरातील सिंहगड रोडवरील एकता नगरी,निंबजनगर, विठ्ठल नगर, जलपूजन अपार्टमेंट तसेच पुलाची वाडी, पाटील इस्टेट विश्रांतवाडी,वारजे,दत्तवाडी, दांडेकर पूल,कोरेगाव पार्क, बोपोडी,येरवडा या परिसरात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यास युद्धपातळीवर मोहीम राबवण्यात आली.

200 स्वयंसेवकांच्या टीम कडून पाण्याखालील परिसरातील गाळ उपसून काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना पुणे शहराचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वतः घटनास्थळी पोहोचत परिस्थितीचा आढाव घेतला.

Nana Bhangire Eknath Shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंनी लोकप्रतिनिधींचा अपमान केला; काँग्रेसच्या आमदाराचा गंभीर आरोप

शिवसेनेमार्फत अतिमुसळधार पावसामुळे व पुरामुळे शहरातील विविध ठिकाणी नागरिक अडकले असता त्यांना तातडीने सुरक्षितरित्या हलविण्यात आले व यावेळी नागरिकांना झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय मदत पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आली होती.

तसेच पुरानंतर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य साथ रोगाच्या शक्यतेमुळे नागरिकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून देण्यात येणार आहे, असे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे.

फडणवीस, मोहोळ जबाबदार

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीपात्राची रुंदी कमी करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आला. यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे. आज झालेल्या प्रलायाची संपूर्ण जबाबदारी स्वतःला पुणे शहराचे शिल्पकार म्हणवून घेणारे देवेंद्र फडणवीस व त्यांना मुकाट्याने साथ देणारे मुरलीधर मोहोळ यांची आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

Nana Bhangire Eknath Shinde
Video Naresh Mhaske : नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, शिंदे गटाच्या नेत्याने दिले उत्तर, म्हणाले 'महायुती कसली'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com