Harshwardhan Sapkal: मविआबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय! आघाडीत बिघाडीची शक्यता, हर्षवर्धन सपकाळांनी थेट...

Harshwardhan Sapkal: शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली.
Harshawardhan Sapkal
Harshawardhan Sapkal
Published on
Updated on

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढणार का? याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड उत्सुकता आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार का की नाही याबाबत मोठी घोषणा केली आहे.

Harshawardhan Sapkal
Kolhapur Shivsena : ...म्हणून आता कोल्हापुरातील ठाकरे-शिंदे गटाच्या निष्ठावंतांचा मुंबईत ठिय्या!

शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी ही माहिती दिली. बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, सहप्रभारी बी. एम. संदिप, खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका अध्यक्ष, विविध आघाड्या आणि सेलचे प्रमुख उपस्थित होते.

Harshawardhan Sapkal
Sujat Ambedkar: ...तर रामदास आठवलेंशी युती होऊ शकते! सुजात आंबेडकरांच्या 'त्या' विधानानंतर आठवले काय घेणार निर्णय?

सपकाळ यांनी सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्षासाठी आपली संघटना मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पक्ष वाढीवर प्राधान्य देताना निवडणुकीच्या रणनीतीचा विचार करणे गरजेचे आहे. युती किंवा आघाडीमुळे काहीवेळा पक्षाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती, आघाडी की स्वबळ याचा निर्णय स्थानिक नेत्यांना स्वातंत्र्याने घेता यावा, असे पक्षाने ठरवले आहे.

Harshawardhan Sapkal
Marathwada Floods: महापुरात बुडालेल्या झेडपीच्या शाळा उभ्या करणार; अजित पवारांच्या आमदारानं जाहीर केली 20 लाखांची मदत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या की युती किंवा आघाडीच्या माध्यमातून याचा निर्णय पातळीवर घेतला जाणार नाही. याबाबत काँग्रेसचं हे स्पष्ट मत असून आम्ही हा निर्णय महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना देखील कळवण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

Harshawardhan Sapkal
Arun Dengale: अरुण डोंगळे केवळ गोकुळसाठीच राजकीय पटलावर? महायुतीत शह-काटशहचं राजकारण

आघाडीत बिघाडीची शक्यता

महाविकास आघाडीबाबत यापूर्वीही सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून करण्यात आलेल्या वाटाघटीमध्ये कुठेतरी उणिवा राहिल्या. लोकसभेच्या 48 जागा आणि विधानसभेच्या 288 जागांच्या वाटाघाटी राज्यपातळीवर केल्यामुळे उणिवा राहिल्या आणि आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतही तसाच निर्णय घेतल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे.

युती आघाडी करत असताना कोणत्याही पक्षाचं नुकसान होत असतं लोकसभा आणि विधानसभेला महाविकास आघाडी लढल्यामुळे अनेक ठिकाणी आमचा पंजा गायब झाला आहे. त्यामुळे आमचं पक्ष चिन्ह सर्वत्र पोहोचू शकले नाही. त्यामुळे पक्ष कमजोर होत चालला आहे अशा कार्यकर्त्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे हा निर्णय स्थायिक पातळीवर घेणं योग्य ठरणार आहे. सपकाळ यांच्या या भुमिकेमुळं मात्र आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com