
पुणे : 14 मार्च |लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) बार उडत असतानाच काँग्रेसचे आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी गुरुवारी ( 14 मार्च ) सकाळी आयुक्त विक्रम कुमार ( Vikram Kumar ) यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला. महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत धंगेकरांनी महापालिका प्रशासनाला कोंडीत पकडलं. धंगेकरांच्या या पवित्र्यामुळे महापालिका प्रशासनाला झटका बसल्याचं मानले जात आहे.
भाजपनं पुण्यातून मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर काही तासांतच धंगेकरांनी थेट आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करून एकप्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"विक्रम कुमार पालिकेला लुटत आहेत"
"गेल्या दोन वर्षांच्या प्रशासक काळात आयुक्त विक्रम कुमार यांनी भाजपचा अजेंडा राबवण्याचं काम केलं आहे. मी अनेक विकासकामांबाबत आयुक्त विक्रम कुमार यांना पत्रव्यवहार केला. मात्र, त्याकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केलं. महापालिका ही भ्रष्टाचाराचं केंद्र ठरत असून, भाजप आणि विक्रम कुमार पालिकेला लुटत आहेत," असा आरोप धंगेकरांनी ( Ravindra Dhangekar ) केला.
"नगरसेवक नसताना वॉर्डांमध्ये निधी वाटप"
"आयुक्तांनी मेडिकलच्या नावे असलेले 174 कोटी रुपये वर्गीकरण करून वॉर्डमध्ये वाटले आहेत. नगरसेवक नसतानादेखील त्यांच्या वॉर्डांमध्ये निधी देण्यात येत आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे," असं धंगेकरांनी म्हटलं.
"आयुक्तांकडून महापालिकेत अनागोंदी कारभार"
"विक्रम कुमार यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असतानादेखील त्यांची अद्याप बदली झालेली नाही. ते भाजपचा अजेंडा राबवत असून, भाजपच्या लोकांना हाताशी धरून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी मार्गी लावली आहेत. आयुक्तांकडून महापालिकेत अनागोंदी कारभार सुरू असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहे," असंही धंगेकरांनी सांगितलं.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.