Ravindra Dhangekar News : उमेदवारीचे संकेत मिळताच धंगेकरांची मोहोळांच्या बालेकिल्ल्यात धडक; मुद्द्यालाच हात घातला

Murlidhar Mohol News : भाजपकडून मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  
Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Ravindra Dhangekar, Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar News) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. धंगेकर यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी आपलेच नाव फायनल असल्याची खात्री पटताच आमदार धंगेकर यांनी गुरुवारी सकाळीच कोथरूड येथील तात्यासाहेब थोरात उद्यानात उभारण्यात येणाऱ्या मोनोरेल प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन केले. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या बालेकिल्ल्यात आंदोलन करत धंगेकरांनी त्यांना सूचक इशारा तर दिला नाही ना, अशी चर्चा पुणेकरांमध्ये रंगली आहे.  

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) वारे आता जोरदार वाहू लागले आहेत. पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातदेखील केलेली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने (Mahavikas Aghadi) पुणे लोकसभेसाठी अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Constituency) हा काँग्रेसच्या वाट्याला आलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचा (Congress) उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Vasant More News : 'इस शहर में दबदबा है हमारा...'; वसंत मोरेंचा नेमका कुणाला इशारा ?

पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचा (BJP) उमेदवार विजयी होत आहे. दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे विजय झाले होते, तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विजयश्री खेचून हॅटट्रिक करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जाणार आहे.

महाविकास आघाडीकडून कोणाला संधी द्यायची, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. बुधवारी रात्री झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पुणे लोकसभेसाठी धंगेकर यांच्या नावाला पसंती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेच्या काही जागांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता असून, यामध्ये पुण्यातून धंगेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाव अंतिम झाल्याचे लक्षात येताच आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट कोथरूड येथील तात्यासाहेब थोरात उद्यानात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. या उद्यानात महापालिकेच्या वतीने मोनोरेल प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी या उद्यानातील झाडे तोडण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत हा प्रकल्प उभारण्यास कडाडून विरोध केला आहे. माजी महापौर आणि महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत असताना या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या उद्यानात हा प्रकल्प उभारण्याची संकल्पना मोहोळ यांची होती.

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Lok sabha Election 2024 : 'पुण्यात काँग्रेसने सक्षम उमेदवार न दिल्यास..' ; पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी!

या भागातील काही नागरिकांनी आमदार धंगेकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तातडीने या उद्यानात जाऊन धंगेकर यांनी नागरिकांशी चर्चा केली. स्थानिक नागरिकांचा विरोध असताना प्रशासनाने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. प्रसंगी यासाठी जनआंदोलन उभारू, असा इशाराही धंगेकर यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या उद्यानात उभारण्यात येणाऱ्या मोनोरेल प्रकल्पाला नागरिकांचा विरोध सुरू आहे. मात्र, संधी साधत आमदार धंगेकर यांनी या प्रश्नात लक्ष घालत आपल्या प्रचाराची सुरुवात केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराच्या भागात जाऊन आंदोलन करत प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका आमदार धंगेकर यांनी घेतली आहे. या भागातील नागरिकांची मते मिळवण्यासाठी आमदार धंगेकर यांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनाबाबत आमदार धंगेकर म्हणाले, हे उद्यान म्हणजे येथील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने फार मोठी सुविधा आहे. उद्यानाचे सौंदर्य नष्ट करणे म्हणजे लोकांचा श्वास नष्ट करण्यासारखे आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना वेळ दिली गेली नाही. यापुढे आम्ही आणि महाविकास आघाडी या नागरिकांसोबत कायम आहोत. प्रकल्पाला विरोध म्हणून या भागातील नागरिक जनआंदोलन उभे करणार आहेत. त्यामध्येही आम्ही सहभागी होणार आहोत.

R

Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol
Pune Lok Sabha News: काँग्रेसचं ठरलं! पुण्यातून रवींद्र धंगेकर फायनल, 'या' सात जागांचेही उमेदवार जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com