Vasant More News : वसंत मोरेंना काँग्रेसची ऑफर; मोहन जोशींनी घेतली भेट...

Manse pune मनसेचे नेते वसंत मोरे लोकसभा निवडणुकीवरून नाराज होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
Vasant More, Mohan Joshi
Vasant More, Mohan Joshisarkarnama

Congress News : मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे यांना काँग्रेसची ऑफर आली असून, याबाबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी त्यांची नुकतीच भेट घेऊन प्रवेशाबाबत विनंती केली. यावर कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण मोरेंनी दिले आहे. मोरे लोकसभा लढविण्यावर ठाम आहेत.

मनसेचे नेते वसंत मोरे लोकसभा निवडणुकीवरून नाराज होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी परत यावे यासाठी त्यांना मनसेमधील अनेक नेत्यांचे फोन आले, पण त्यांनी मी परतीचे दोर कापलेले आहेत, असे ठणकावून सांगितले आहे.

वसंत मोरे म्हणाले, मला सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचेही फोन आले होते. संजय राऊत म्हणाले, तुम्ही सक्षम आहात आणि योग्य निर्णय घ्याल. तसेच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही मित्र म्हणून काल फोन केला होता.

Vasant More, Mohan Joshi
वसंत मोरेंना काँग्रेसची ऑफर, पुण्यातून खासदारकी मिळणार ? | Vasant More | Congress Pune |

माझ्या निर्णयामुळे सोशल मीडियावर माझे दोन हजार फॅलोअर्स वाढले आहेत. पण, मी कोणाला फॉलो करायचे हे मी नक्की सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. वसंत मोरे हे काँग्रेसच्या संपर्कात असून, त्यांना काँग्रेसकडून ऑफर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरेंची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोघांत विविध विषयांवर चर्चा झाली. यासंदर्भात बोलताना मोहन जोशी म्हणाले, वसंत मोरे यांना काँग्रेसकडून ऑफर असून, त्यांनी पक्षात प्रवेश करावा, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यावर वसंत मोरे म्हणाले, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. मी लोकसभा लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

R

Vasant More, Mohan Joshi
Pune Congress News : बागुलांच्या लेटर बॉम्बनंतर तिवारींचा नाराजीचा संदेश! पुणे काँग्रेसमध्ये पुन्हा उफाळून आली गटबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com