Pune Assembly Election : विद्यमानांना धाकधूक, इच्छुकांचे देव पाण्यात, कुणाला उमेदवारी?

Pune Political News: पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता काहीच विधानसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. इतर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी देव पाण्यात ठेवत उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षेत आहेत.
vidhansabha Election 2024
vidhansabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये अद्यापही जागा वाटपावरून खलबत सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश जागांवर एकमत होऊ न शकल्याने अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता भाजपने कोथरूड शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

तर खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी देव पाण्यात ठेवून उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र भाजपकडून कोथरूडमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी थेट अर्ज भरण्याची तारीख जाहीर करून टाकली आहे. 24 ऑक्टोबरला चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आज पासून विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असले तरी अद्याप भाजप वगळता इतर कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. भाजपने (BJP) अद्याप कसबा पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात (Khadakwasla) अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. यामुळे खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट मधील विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार की भाजप धक्का तंत्र अवलंबणार याबाबत राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा सुरू आहेत.

vidhansabha Election 2024
Rohit Pawar: सत्ताधारी उमेदवारांना पहिला 'हप्ता' मिळाला? एक गाडी सापडली, अजून चार गाड्या कुठे आहेत?

तर महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) पुण्यातील जागांच्या वाटपाबाबत एक मत झालं नसल्याचा समोर आला आहे. हडपसर, खडकवासला, पर्वती या मतदारसंघांवर महाविकास आघाडीचा पेच फसला आहे. त्यामुळे शहरातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले असून सातत्याने वरिष्ठांशी संपर्क साधून आपला उमेदवारीचा खुट्टा मजबूत कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

vidhansabha Election 2024
Ravindra Dhangekar : पोलिसांनी पाच कोटी पकडले, रवींद्र धंगेकर गंभीर आरोप करत म्हणाले, 'त्या' गाडीत शहाजीबापुंची माणसं

तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी आपला निवडणुकीचा नारळ फोडला असून पुढील दोन दिवसात पुणे शहरातील दोन खासदारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. कोथरूडचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नसताना देखील चंद्रकांत पाटील अर्ज दाखल करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com