Pune News, 24 Oct : महाराष्ट्राचे माजी राज्य मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या हत्येनंतर पोलिस देशभरात तपास यंत्रणा राबवत असून या प्रकरणाशी संबंधित आरोपींना ताब्यात घेत आहेत. सिद्दिकी यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन याआधीच समोर आलं आहे.
अशातच आता या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट पुण्यातील (Pune) कर्वेनगर भागात रचल्याचं तपासातून उघडकीस आलं आहे. मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला याआधी अटक केली आहे.
तर प्रवीणचा भाऊ शुभम लोणकरचा फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होते. रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ आणि रियान खान असं पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रवीण लोणकर हा कर्वेनगर भागात डेअरी चालवायचा. तर त्याचा भाऊ शुभम समाजमाध्यमातून बिश्नोई गँगच्या संपर्कात होता. याच प्रकरणात बिश्नोई टोळीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुभमला पोलिसांनी अटक केली होती.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असून सलमान खानशी जवळीक आणि मैत्रीचे संबंध असल्यामुळेच बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.