पिंपरी पालिकेच्या श्रीमंतीला लागली घरघर; अवघ्या पाच कोटींवर आली शिल्लक

वर्षाला तीनशे कोटी रुपयांचे ठेवींवरील व्याज मिळणाऱ्या पिंपरी पालिकेला (PCMC) येत्या आर्थिक वर्षात ते फक्त एकशे चाळीस कोटी रुपयेच मिळणार आहेत.
pcmc
pcmc Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : आशिया खंडात श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) या किताबाला कोट्यवधी रुपयांच्या नाहक उधळपट्टीने आता घरघर लागण्यास सुरवात झाली आहे. त्यात कोरोनाने गेल्या दोन वर्षात आणखी भर टाकली आहे. परिणामी पाचशे कोटी रुपये आरंभीची शिल्लक व तेवढेच शिलकी असलेले पिंपरी पालिकेचे गेल्या काही वर्षापर्यंत सादर होणारे बजेट (Budget) २०२२-२३ ला आता फक्त पाच कोटी शिलकीचे झाले आहे. मात्र, त्यापुढील बजेट (२०२३-२४) हे शिलकी असेलच याची खात्री, मात्र देता येणार नाही, अशीच सद्यस्थिती आहे.

pcmc
आमदार लांडगें पाठोपाठ जगतापांनाही झटका; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीत

कोरोनाने पालिकेचा खर्च गेल्या दोन वर्षात अमाप वाढला आहे. दुसरीकडे, मात्र उत्पन्नात तेवढीच घट झाली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे कसलीही करवाढ वा दरवाढ पालिकेला करता आलेली नाही. घटत चाललेल्या व्याजदरामुळे पालिकेच्या ठेवींवरील व्याजातही निम्याने घट आली आहे. वर्षाला तीनशे कोटी रुपयांचे नुसते ठेवींवरील व्याज मिळणाऱ्या पालिकेला येत्या आर्थिक वर्षात ते फक्त एकशे चाळीस कोटी रुपयेच मिळणार आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबी यांनी सोमवारी (ता.२१फेब्रुवारी) दिली. तर, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात पालिकेच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. एकूणच पालिकेच्या श्रीमंतीला आता घरघर लागण्यास सुरवात झाली आहे.

pcmc
छत्रपतींच्या भगव्याचे रक्षण व सुरक्षा फक्त भाजपवरच! : सेनेला फडणविसांचा टोला

गेल्या पाच वर्षात कोट्यवधींचा नाहक खर्च झाला असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. गरज नसलेल्या, गुळगुळीत रस्त्यांच्या डांबरीकरण व कॉंक्रीटकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. शिवसेनेचे गटनेते व राष्ट्रवादी पक्ष पदाधिकाऱ्याने नुकतेच ते दाखवून देत तसा आरोप केला आहे. गरज नसलेल्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांच्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरुच आहे. गेल्या पाच वर्षात, तर अशा सल्लागारांचे मोठे पीकच आले आहे. कुशल वा तांत्रिक सल्याची वा सल्लागाराची गरज नसलेल्या पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या साध्या कामांसाठीही सल्लागार नेमल्याचे आक्रित या श्रीमंत पालिकेत घडलेले आहे. दुसरीकडे सल्लागार नियुक्तीची कामे करणे अपेक्षित असलेले पालिकेच्या स्थापत्यसह इतर विभागाचे कार्यकारी अभियंते व अधिकारी लाखो रुपये पगार घेऊन सल्लागार नेमणे सुरुच आहे.

कोट्यवधी रुपयांच्या बनावट ठेवी व एफडीआर सादर करून पालिकेची फसवणूक करण्याचे प्रमाणही गेल्या पाच वर्षात प्रचंड वाढले आहे. एकूणच अशा परिस्थितीमुळे उत्पन्न कमी होऊन खर्च वाढल्याने पालिका बजेटची आरंभीची शिल्लक कमी होत चालली आहे. परिणामी कमी शिलकेचे बजेट यावेळी सादर झाल्याचे पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. त्यामुळेच गेल्या वर्षापेक्षा यावेळच्या बजेटच्या रकमेत घटही झाली आहे.

pcmc
भाजपची मुदत संपता-संपता 'जायका'ला मिळाली मंजुरी

घरात लग्नकार्य असल्याने पिंपरी पालिकेचे आपले पहिलेच बजेट सादर करतेवेळी उपस्थित राहू शकलो नसल्याची खंत आय़ुक्तांनी आज व्यक्त केली. मात्र, येथे आल्यापासून गेल्या वर्षभरात रजाच न घेतल्याने ती या लग्नासाठी सरकारची परवानगी घेऊन प्रथमच घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालिकेचे येत्या आर्थिक वर्षाचे (२०२२-२३) बजेट हे आय़ुक्त नसल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी नुकतेच (ता.१८ फेब्रुवारी) स्थायी समितीला सादर केल्याने त्याची चर्चा झाली होती. त्याचा रजेवरून आलेल्या आयुक्तांनी हा खुलासा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com