भाजपची मुदत संपता-संपता 'जायका'ला मिळाली मंजुरी

पुणे महापालिकेने (PMC) राबविलेल्या निविदा प्रक्रियेला 'जायका' ने आज मान्यता दिली आहे.
Mula-Mutha River
Mula-Mutha RiverSarkarnama
Published on
Updated on

पुणे : गेल्या सहा वर्षापासून रखडलेल्या शहरातील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महापालिकेने (PMC) राबविलेल्या निविदा प्रक्रियेला जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सी (जायका) ने आज (ता.२१ फेब्रुवारी) मान्यता दिली आहे. त्यामुळे हा १ हजार ४७३ कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव स्थायी समितीच्या (Standing Committee) मान्यतेनंतर लगेच सुरू होणार आहे. हा प्रकल्प एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्यूशन (JV) ही कंपनी करणार आहे.

Mula-Mutha River
PCMC तील भाजपची गळती थांबेना : फडणविसांनी विनंती करूनही नगरसेविकेचा राजीनामा!

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने मुळ-मुठा (Mula-Mutha) नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मैलापाण्याची यंत्रणा उभी राहावी यासाठी २०१६ मध्ये 'जायका' च्या मदतीने प्रकल्प मंजूर केला. त्यामध्ये प्रकल्पाच्या ८५ टक्के खर्च हा जायकाकडून दिला जाणार आहे. तर महापालिकेला १५ टक्के खर्च करावा लागणार होता. अशा प्रकारे ८४१.७२ कोटी जायका व महापालिकेचे १४८.५४ कोटी रुपये खर्च अपेक्षीत होता.

हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्याचा सल्लागार नेमणे, निविदा काढणे यामध्ये लालफितीच्या कारभारात प्रकल्प अडकला. त्यामुळे गेल्या सहा वर्षात काहीच झाले नाही. महापालिकेच्या कामकाजावर केंद्र सरकार तसेच जायकाकडून ताशेरे ओढल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२१ ला निविदा प्रक्रिया सुरू झाली. या प्रकल्पाला उशीर झाल्याने ९९०.२६ कोटी रुपयांचा खर्च तब्बल १५०० कोटींवर गेला. त्याचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागणार आहे.

Mula-Mutha River
युपीत मुस्लीमांना तिकीट का देत नाहीत? अमित शहांनी दिले रोखठोक उत्तर

या प्रकल्पांसाठी ६ कंपन्यांनी निविदा भरली होती, पण जायका कंपनीचे निकष व कागदपत्रांची पूर्तता करू शकणारी एकमेव कंपनी यासाठी पात्र ठरली. महापालिकेने जानेवारीच्या शेवटच्या 'व्हीडीओ शूटिंग' करून ही निविदा उघडली. त्यामध्ये एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्यूशन (जे.व्ही.) कंपनीने १४ टक्के जादा रकमेची निविदा भरल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या योजनेचा खर्च १७०० कोटीवर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या योजनेचा खर्च वाढलेला नसून, महापालिकेने निश्‍चीत केलेल्या १५११ कोटी या रकमेपेक्षा अर्धा टक्का कमी दराने निविदा आली आहे.

या प्रकल्पाच्या ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आणि सुमारे ५६ किलोमीटरची जलवाहिनी टाकणे यासाठी १०९५ कोटी रुपये खर्च येणार आहे. तर १५ वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी ३००.२१ कोटी रुपये असा एकूण १४७३.२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. यानिविदेची सल्लागाराकडून पडताळणी झाल्यानंतर जायका कंपनीनेही तपासणी केली. त्यास मान्यता दिल्याचे पत्र आज महापालिकेला मिळाले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या मंजुरीतील अडथळे दूर होणार आहेत.

Mula-Mutha River
Video: "केंद्रातून नारायण राणेंना का नोटीस आली ?", किशोरी पेडणेकर

शहरातील मुळामुठा नदी स्वच्छ करण्यासाठी जायका प्रकल्प महत्त्वाचा आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस आज जायकाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता स्थायी समितीची मान्यता झाल्यानंतर याप्रकल्पाचे भूमिपूजन करणे शक्य होणार आहे. महापालिकेकडून नदी काठ सुधार प्रकल्प हाती घेतला असताना त्याच बरोबर ‘जायका’ प्रकल्पही सुरू होऊन शहरातील दोन्ही नद्यांचे रुप पालटेल, असा विश्वास पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com