Crime New : कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, भरदिवसा व्यावसायिकावर गोळीबार

Crime New Shoot at a businessman : शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहर पुन्हा एकदा हादरले आहेत.
firing news.jpg
firing news.jpgsarkarnama
Published on
Updated on

Pune News : विद्येचे माहेर घर, सुरक्षित शहर म्हणून नावलौकिक असलेल्या पुणे शहरात काय चालले आहे, असा प्रश्न सुजान नागरिकांना पडतो आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसावर हल्ला झाला होता. त्यानंतर माजी नगरसेवकावर हल्ला करत खून करण्यात आला. त्यानंतर आज (सोमवारी) भरदिवसा वाळू व्यावसियाकावर गोळीबार करण्यात आला आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहर पुन्हा एकदा हादरले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याच प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातील साळवे नगर येथे वाळू व्यावसायिकावर आज (सोमवारी) एकच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

firing news.jpg
Muslim voters : मुस्लिम मतांची धास्ती, आता 'षडयंत्र'; 'MIM'च्या अशरफींचा खळबळजनक आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीवर आलेल्या अज्ञात तरुणांनी वाळू व्यावसायिकावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. तरुणांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत असून यामध्ये पोलिसांना यश आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतला आहे.गोळीबार झालेल्या व्यावसायिकाचे नाव दिलीप गायकवाड असे आहे.

गोळीबारात जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कोंढवा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अधिकचा तपास सुरू.

पोलिसांची भीती राहिली नाही?

पुणे शहरात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. भर दिवसा व्यावसायिकावर गोळीबार असो नाहीतर माजी नगरसेवकाची हत्या, वायफाय दिले नाही म्हणून सामान्य माणसाची हत्या करण्यात गुन्हेगार मागेपुढे पाहत नाहीत. गोळीबार आणि हत्येच्या घटनांमुळे पुणे शहर हादरले असून पोलिस आपली सुरक्षा करण्यात सक्षम नसल्याचा समज सामान्य नगारिकांमध्ये होताना दिसत आहे.

(Edited By Roshan More)

firing news.jpg
100 days of Modi 3.0 : मोदी सरकार @100 दिवसः निरंकुश सत्तेला ब्रेक, तरीही योजनांचा धडाका; 'मूळ अजेंडा'ही जोमात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com