MTS Jobs 2026: दहावी पास आहात? पुण्यात सरकारी नोकरीची संधी; CSIR-NCL मध्ये भरती सुरु; पगार 40 हजार, अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या!

CSIR NCL Pune Recruitment: CSIR-NCL पुणे येथे मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या २४ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी असून ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
CSIR NCL Pune Recruitment
CSIR NCL Pune RecruitmentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: पुणे येथील 'सीएसआयआर - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला' (CSIR-NCL) मध्ये 'मल्टी-टास्किंग स्टाफ' (MTS) या पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. याद्वारे एकूण २४ रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र व इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

भरतीचा तपशील

  • एकूण पदे: २४ जागा

  • पदाचे नाव: मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी (SSC/Matriculation) परीक्षा उत्तीर्ण.

  • वेतनश्रेणी: ७व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-०१ (₹ १८,००० ते ₹ ५६,९००). (अंदाजे एकूण वेतन ₹ ४०,०००/- पर्यंत).

CSIR NCL Pune Recruitment
Census 2027: जनगणनेच्या तारखा जाहीर! घरोघरी होणार नोंदणी; निवडणूक असलेल्या राज्यांना तूर्तास सूट, कोणते प्रश्न विचारणार?

नोकरीचे ठिकाण: पुणे (महाराष्ट्र)

आरक्षण आणि पदांचे वर्गीकरण:

  • अनारक्षित (UR): ११

  • इतर मागासवर्गीय (OBC-NCL): ०७

  • अनुसूचित जाती (SC): ०२

  • अनुसूचित जमाती (ST): ०१

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): ०३

(एकूण २४ पैकी १ पद PwBD श्रेणीसाठी राखीव आहे)

CSIR NCL Pune Recruitment
ZP Headmasters: झेडपी मुख्याध्यापकांसाठी मोठी खुशखबर! सुटीत काम केल्यास दरवर्षी मिळणार 15 दिवसांची अर्जित रजा; पण एक अट!

अर्ज शुल्क

* खुला प्रवर्ग (UR), OBC आणि EWS उमेदवारांसाठी: ₹ ५००/-

* महिला, SC, ST, PwBD आणि माजी सैनिक (Ex-Servicemen) उमेदवारांसाठी: कोणतेही शुल्क नाही (NIL).

CSIR NCL Pune Recruitment
PAT Test Maharashtra: दिवाळीची सुट्टी संपताच विद्यार्थ्यांसमोर नवं संकट; शालेय शिक्षण विभागाचा 'हा' मोठा निर्णय!

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ५ ऑक्टोबर २०२६ (सकाळी १०:०० वाजल्यापासून)

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ४ नोव्हेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)

इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न बघता लवकरात लवकर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (`\[https://recruit.ncl.res.in](https://recruit.ncl.res.in)`) जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याची आवश्यकता नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.