Indapur Politics : भरणेमामा म्हणतात, ‘गड्या आपली विधानसभाच बरी...!’

Dattatray Bharane On Loksabha Election : खासदार व्हावं, असं माझ्या आयुष्यात कधीही डोक्यात आलं नाही.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Indapur News : खासदार व्हावं, असं माझ्या आयुष्यात कधीही डोक्यात आलं नाही. ज्या इंदापूर तालुक्याने मला मोठं केलं, विधानसभेपुरतचं माझं बरं आहे. कशाला लोकसभा आणि काय करायचं. आपला तालुकाच बरा! असं म्हणत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (Dattatray Bharane's refusal to contest the Lok Sabha elections)

आमदार दत्तात्रेय भरणे हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू होती. त्यावर बोलताना आपण विधानसभेला खूश असून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत नकार दर्शवला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिला त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dattatray Bharane
Sushilkumar Shinde : कोर्टातील पट्टेवाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; सुशीलकुमार शिंदेंची चढती राजकीय कमान

इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील कार्यक्रमात आमदार भरणे बोलत होते. ते म्हणाले की, तुमची सेवा हीच माझी सेवा आहे. ज्याला लोकसभेला उभं राहायचं आहे, त्यांना राहू द्या. आपल्याला त्यात पडायचं नाही. तालुक्यातच तुमची सेवा करेल. आपला तालुकाचा बरा आहे.

इंदापूर तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या भूमिपूजन फलकावर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव लिहिण्यात आले नव्हते. त्यावरून शरद पवार गटातील कार्यकर्ते आणि भरणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावरही भरणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील एक व्हीआयपी गेस्ट हाऊस आणि कामगारांच्या क्वॉर्टरसाठी बांधकाम राज्यमंत्री असताना साडेसहा कोटी रुपये मंजूर केले होते. त्या कामाच्या भूमिपूजन फलकावर चुकून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव टाकायचे राहिले होते. मात्र, त्यावरून मोठे राजकारण करण्यात आले.

Dattatray Bharane
CM Davos Tour : दावोस दौरा औद्योगिक वाढीसाठी की सरकारच्या पर्यटनासाठी? वडेट्टीवारांचा खडा सवाल

गेल्या नऊ ते साडेनऊ वर्षांत तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला, त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे हेाते. मात्र, ते सोडून सुप्रिया सुळे यांचे नाव राहिल्याने राजकारण केले गेले. मात्र, ज्यांनी राजकारण केले, त्यांच्या मागे कोण लोक आहेत, त्यांनी काय काय उद्योग आणि भानगडी केल्या आहेत. हे तपासले पाहिजे. अशा लोकांना खड्यासारखे बाजूला केले पाहिजे, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

Dattatray Bharane
Sangli Loksabha : संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात; काँग्रेसचे विशाल पाटील एकीच्या एक्स्प्रेसवर स्वार!

भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात मी गेली नऊ वर्षे आमदार म्हणून काम करत आहे. निधी देताना किंवा विकास कामे करताना कधीही जवळचा अथवा लांबचा, जातीचा पातीचा माणूस पाहिला नाही. तालुक्यातील एकाही नागरिकाला माझ्या घराचे उंबरे झिजवायला लावले नाहीत. गोरगरीब माणसाला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी स्वत:च्या खर्चाने कामाला माणसे ठेवली आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Dattatray Bharane
Shahajibapu News : शहाजीबापूंंनी गणपतआबांच्या नातवाला ललकारले; आजोबाला जे जमलं नाय, ते नातवाला काय जमायचं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com