Swarget Bus Rape Case : बायको, मुल असूनही दत्तात्रय गाडे म्हणतोय, मी तृतीयपंथी-समलैंगिक!

Dattatraya Gade Swarget Bus Rape Case : दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने त्याची पाठराखन करत म्हटले की, जर बलात्कार झाला असेल तर त्या तरुणीचे कपडे फाटलेले का नव्हते. तिने आरडाओरडा का केला नाही?
Pune Bus Rape Case accused datta Gade
Pune Bus Rape Case accused datta Gade Sarkarnama
Published on
Updated on

Dattatraya Gade News : स्वारगेट एसटी बसस्थानकातील शिवशाही एसटीमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालायने गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासामध्ये दत्तात्रय गाडे यांनी आपण तृतीयपंथी असल्याचा जबाब दिला आहे. तसेच त्याने आपण समलैंगिंक असल्याचे देखील म्हटले. विशेष म्हणजे दत्तात्रय गाडे याचे लग्न झालेले असून त्याला बायको आणि मूल देखील आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे यांनी दिलेल्या जबाबामुळे पोलिस त्याची लैंगिक क्षमता चाचणी घेतली. तसेच त्याची डीएनए चाचणी देखील घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडे याची लैंगिक क्षमता चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे स्वतःच्या बचावासाठी तो तृतीयपंथी, समलैंगिक असल्याचे सांगत आहे.

Pune Bus Rape Case accused datta Gade
Praniti Shinde : दिल्लीत पोचलेल्या प्रणिती शिंदेंना सोलापुरातील काँग्रेसच्या पडझडीची ना चिंता ना पश्चाताप!

दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने त्याची पाठराखन करत म्हटले की, तरुणी बसमध्ये गेली आणि दोन मिनिटामध्येच बाहेर आली. दोन मिनिटीमध्ये बलात्कार होतो का? जर बलात्कार झाला असेल तर तिचे कपडे फाटलेले का नव्हते. तीने आरडाओरडा का केला नाही? असे प्रश्न करत हे संबंध संमतीने झाले असल्याचे म्हटले.

तरुणीसोबत दत्तात्रय गाडेची ओळख?

दत्तात्रय गाडे याच्यात आणि तरुणीमध्ये सहमती संबंध आल्याचा दावा त्याच्या वकीलाने देखील केला आहे. तसेच ही तरुण मागील एक महिन्यापासून दत्तात्रय गाडे याला ओळख असल्याचे देखील वकीलाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न आरोपीकडून होत असल्याचा दावा देखील करण्यात येतो आहे.

गळा दाबून अत्याचार

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दत्तात्रय गाडे याने आपल्या ताई म्हणत कंडक्टर असल्याचे भासवत बसमध्ये नेले त्यांनतर न गळा दाबून अत्याचार केला. त्यानंतर ‘दादा मला घरी जाऊ द्या,’ अशी विनवणी केली मात्र मारहाण करत दुसऱ्यांदा अत्याचार केला, असे म्हटले आहे.

Pune Bus Rape Case accused datta Gade
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढणार; 'त्या' कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची देशमुख कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com