Sharad Pawar Politic's ; पुणे जिल्ह्यातील आणखी एक बडा नेता तुतारीच्या वाटेवर; शरद पवारांची घेतली भेट

Daund Assembly Election : दौंडचे माजी आमदार आणि अजितदादांचे निकटवर्तीय रमेश थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. माजी आमदार थोरात हे दौंडमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
Sharad Pawar-Ramesh Thorat
Sharad Pawar-Ramesh ThoratSarkarnama
Published on
Updated on

Pune, 05 October : पुणे जिल्ह्यातील आणखी एक बडा नेता तुतारीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील असून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. संबंधित नेत्याला विधानसभेची निवडणूक लढवायची असून पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दौंडचे माजी आमदार आणि अजितदादांचे निकटवर्तीय रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. माजी आमदार थोरात हे दौंडमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र, महायुतीमध्ये दौंड मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत. कारण मागील निवडणुकीत दौंडमधून राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे थोरात यांनी आपला मार्ग निवडल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील विरोधातील वातावरण आणि मतदारसंघ भाजपला सुटण्याच्या शक्यतेमुळे रमेश थोरात यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून बैठका आणि जनसंपर्कास सुरुवात केली होती. त्यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

दरम्यान, राहुल कुल यांच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडेही सक्षम चेहरा नाही, त्यामुळे थोरात यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाकडूनही जोरदार प्रयत्न सुरू होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनीही मतदारसंघात फिरायला सुरुवात केली होती. त्याचवेळी थोरात हे अजितदादांची साथ सोडणार, हे निश्चित झाले होते.

Sharad Pawar-Ramesh Thorat
Maha Jansampark Abhiyan : लोकसभा निकालाची धास्ती; गडकरी, फडणवीसांसह भाजपचे 32 हजार कार्यकर्ते उतरणार नागपूरच्या मैदानात...

रमेश थोरात यांनी पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद सर्वाधिक काळ भूषविले आहे. तसेच, 2009 मध्ये रमेश थोरात हे अपक्ष निवडून आले होते. मागील 2019 च्या निवडणुकीत थोरात हे अवघ्या 746 मतांनी पराभूत झाले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न थोरात गटाचा दिसून येत आहे.

रमेश थोरात-शरद पवार यांच्या भेटीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचे सर्वांचे अनेक दशकांचे ऋणानुबंध आहेत. जसे आमचे रमेश थोरात यांच्याशी संबंध आहेत, तसे आमचे कुल कुटुंबीयांशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक भेटीमागे गूढ अर्थ असं समजण्याचं कारण नाही. मतदारसंघांतील प्रश्न आहेत. पुणे जिल्हा बॅंकेच्या संदर्भातील विषय असू शकतात. त्यामुळे प्रत्येक भेट ही राजकीय असते, असे काही नाही.

Sharad Pawar-Ramesh Thorat
Madha Politic's : बबनराव शिंदेंच्या भूमिकेमुळे अजितदादांची कोंडी; माढ्यात कल्याण काळे की अभिजीत पाटलांनी संधी?

रमेश थोरात यांच्यासोबत आमचे कौटुंबीक संबंध आहेत. थोरात हे दौंडमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत, ते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी कोणतीही चर्चा माझ्यावर कानावर आलेली नाही. आपण एखाद्याला भेटलो म्हणजे आपण त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहोत, असे होत नाही, असेही खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com