Vijay Shivtare On Ajit Pawar : अजितदादांबद्दल मोठं विधान करत शिंदेंच्या नेत्यांनं मंत्रिपदासाठी थेट पांडुरंगालाच घातलं साकडं!

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी काम केल्यानंतर देखील बारामती लोकसभेच्या निवडणुकीत पुरंदर मधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे अजितदादा गटाचे पदाधिकारी नाराज झाले होते.
Vijay Shivtare- Ajit Pawar
Vijay Shivtare- Ajit PawarSarkarnama

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यातील संबंध सर्वश्रृत आहेत. काही वर्षापासूनची एकमेकांचे हाडवैरी असलेले हे दोघे नेते आता एकमेकांचे जिव्हाळ्याचे मित्र झाले आहेत. अजित पवार आपले मित्र असून त्यांच्याबद्दल मिठाचा खडा पडेल, असे काहीही वक्तव्य करणार नाही. हे सरकार पुन्हा यावे आणि मी मंत्री व्हावे,अशी इच्छाही शिवतारे यांनी बुधवारी बोलून दाखविली.

सासवड येथे बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. या पालखी सोहळ्यात विजय शिवतारे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी काही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याचे संकेत दिले.

विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याची तयारी शिवतारे यांनी सुरू केल्याचे दिसून आले. माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी आपली मैत्री असल्याचे शिवतारे म्हणाले. त्यांच्याबद्दल मीठाचा खडा पडेल, असे वक्तव्य करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Vijay Shivtare- Ajit Pawar
Video Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांचा अजितदादांना मोठा धक्का; शहराध्यक्षांसह 16 माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला..?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे -फडणवीस सरकारला जाहीर पाठींबा देत अजित पवार काही वरिष्ठ नेत्यांबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर महायुतीत सहभागी होत लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यावेळी महायुतीत सहभागी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक असलेल्या विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला विरोध करत बंड पुकारले होते. कोणत्याही स्थितीत पवार कुटूंबाला लोकसभेच्या निवडणूकीत विजयी होऊ देणार नाही, असा संकल्प शिवतारे यांनी केला होता.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर शिवतारे आणि अजितदादा यांच्यात दिलजमाई झाली. त्यानंतर शिवतारे यांनी अजितदादांच्या मैत्रीचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवतारे यांनी काम केल्यानंतर देखील पुरंदर मधून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे अजितदादा गटाचे पदाधिकारी नाराज झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या शिवतारे यांनी अजित पवारांबरोबर मैत्री असल्याचा पुनरुच्चार केला.

Vijay Shivtare- Ajit Pawar
Vidhan Parishad Election News : मोठी बातमी ! काँग्रेसचा पुन्हा घात, नार्वेकर चमत्कार घडवू शकतात; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठं विधान

पालखी सोहळा सासवड नगरीत येणे हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. पालखी सासवडमध्ये उशिरा येण्यामागे प्रशासन काही प्रमाणात जबाबदार आहे, ही काळी नजर कुणाची आहे, हे आमदारांना विचारावे लागेल, असे शिवतारे म्हणाले. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आमदार आणि मंत्री व्हावे,ही मागणी पांडुरंगाकडे केली आहे. मी स्वतः साठी निवडून न येता लोकांसाठी निवडून येतो. हे सरकार पुन्हा यावे, असेही शिवतारे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com